खासदार शरद पवारांना पडला अवकाळी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा विसर!चंद्रपूर:- अवकाळी पावसाने जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तोडांतला घास निसर्गाने हिरावून घेतले आहे.नुकताच देश्याचे माजी कृषिमंत्री जाणते राजे, शेतकऱ्यांचे कैवारी म्हटल्या जाणाऱ्या शरद पवार यांचा चंद्रपूर जिल्ह्यात दौरा सुरू होता. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या अतोनात नुकसानाबाबत काही बोलतील किंवा शेतकऱ्यांच्या बांधावर जातील अशी अपेक्षा होती.मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत शरद पवार अबोलते झाले.त्यामुळे शेतकऱ्यांचे अपेक्षा भंग झालेआहे.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागातील निसर्गाच्या कोपाने शेतकऱ्यांची नुकसान झाल्यास, बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणारे आणि सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी हिरहिरीने भाग घेणारे राष्ट्रवादीचे नेते (Leader of NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांचेकडून मात्र यावेळी जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांचा मात्र अपेक्षाभंगच झाला आहे.
श्री. शरद पवार यांचे मूल दौऱ्याचे दोन दिवस आधीच मूल-सावली तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केला. शेतात कापून ठेवलेले धान अक्षरशः वाहून गेले. हजारो शेतकऱ्यांच्या तोंडातील घास निसर्गाने हिरावून घेतल्यानंतर, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील अशी अपेक्षा होती. शेतकऱ्यांचे हिताबद्दल बोलणारे माजी कृषीमंत्री शरद पवार दौऱ्याच्या मार्गातच अवकाळी पावसाचे बळी पडलेले शेतकरी असल्याने या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांचे दुःख समजून घेतील अशी अपेक्षा होती. मात्र पवारांनी याकडे साफ दुर्लक्ष केले.धान उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांच्यासोबत पत्रव्यवहार करू एवढाच काय शब्दाचा दिलासा तो धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला असून अवकाळीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा मात्र हवेच विरल्या जाईल का असे आता नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांमध्ये बोलल्या जात आहे.अवकाळी नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळण्यासाठी रासपचे निवेदन
चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात धान उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.तोडांत आलेला घास निसर्गाने पळवून नेले आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून उपासमारीचे संकट ओढवले आहे.आधीच बेरोजगारीने जनसामान्य वैतागले असतांना निसर्गाच्या अवकृपेमुळे आणखी बेरोजगारीत वाढ होतांना दिसत आहे.यापुर्वी अतीवृष्टी, दुष्काळी, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात घट झाली आहे.त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी रासपचे जिल्हाध्यक्ष संजय कन्नावार, कुमार जुनमलवार ,मुन्ना मॅकलवार,नितीन धुपे,गुणवंत बोरकर,पंकज धारणे व पदाधिकारी यांनी माजी कृषिमंत्री शरद पवार , मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना निवेदन देण्यात आले आहे.