▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

धानोरा तालुक्यातील मुस्का परीसरात हत्तींचा धुमाकूळ!गडचिरोली:-जिल्हयात मागील काही महिन्यांपासून ओडीसा राज्यातून आलेल्या हत्त्याच्या कळपाने धुमाकूळ घातला असून अनेकांना नुकसानीचा फटका बसला आहे.मुस्का,सालेभट्टी व परीसरातील नागरीकांचे घरे व शेतातील धानाचे पुंजने व शेतमाल उद्ध्वस्त केले आहे.हत्तीच्या हौदोसामुळे परीसरातील नागरीक भयभीत झाले असून रात्रभर गस्त घालावे लागत आहे.या हत्तीना हाकलून लावण्यासाठी वनविभागाचे विशेष प्रयत्न सुरू असून अजूनही वनविभागाचे गस्त सुरू आहे.प्राप्त माहीतीनुसार हत्तीचे कळप मालेवाडा वडसा वनविभागाच्या दिशेने गेले असल्याची माहिती मिळाली आहे.हत्तींच्या धुमाकुळामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता परीसरात केली जात आहे