▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

मूलमध्ये युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश!मूल प्रतिनिधी:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वार्ड तिथे राष्ट्रवादी या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या सुचणेनुसार, तसेच बल्लारपूर विधान सभा क्षेत्र अध्यक्ष सुमित समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात बैठक घेण्यात आली!
सदर बैठक शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, कार्याध्यक्ष महेश जेंगठे ,नितेश मँकलवार ,अविनाश सावसागडे, अशोक कोरेवार ह्यांच्या प्रयत्नाने मूल येथील वार्ड क्रमांक १ येथील बहुसंख्य युवाकार्यकर्त्यांनी जाहीररीत्या प्रवेश घेतला.
आणखी नवीन युवकांचा पक्ष प्रवाशाने पक्षात कार्यकर्त्यांची भर पडत असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांना बैठकीत उपस्थित प्रमुख मार्गदर्शकांनी मार्गदर्शन करतांना सांगितले !
सदर बैठकीत आकाश यारेवार, वैभव चौधरी, संतोष गाजुलवार,सतीश केदार, महादेव नरुले,दिलीप मडावी,बाबुराव कंकलवार, पवन उरकुडे,वासू कंकलवार, आकाश लंबूवार,मुकेश लंबूवार, चेतन गंजीवार, विजय अल्लीवार, रमेश मडावी,आशिष कुळमेथे, शुभम मडावी,दिलीप तांगडे,बाळकृष्ण शेरकी,हर्षद धुळेवार,सुरेश चौधरी,तुषार धारने, वासुदेव चौधरी,विश्वनाथ धारणे, अजय नरुले,राकेश नागापुरे ,अतुल कुंभरे,अमोल धारणे, अभय चौधरी,रवी नागापुरे ,ज्ञानेश्वर गुरनुले,दिलीप चौधरी, आदी युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश केला !
युवकांनी वार्डातील नागरिकांचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावेत व आम्ही सारे युवकांच्या पाठीशी खंबीरपणे राहू व समोर येणाऱ्या नगरपालिका निवडणूका सर्व शक्तीनिशी लढवू अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीतभाऊ समर्थ ह्यांनी दिले!
तसेच घरा घरा पर्यंत राष्ट्रवादी पोच्यवणासाठी आपण सर्व मिळून कार्य करुन जनतेची मने जिंकुन दाखवु अशी घोषणा व सल्ला प्रा,किसनराव वासाडे सर, हेमंतजी सुपणार ,शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे व शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे , संदीपजी तेलंग , संदीप धारणे यांनी युवकांना मार्गदर्शन केले!