गडचांदूर न. प. मध्ये वाढीव दरात विकास कामांना मंजूरी?गडचांदूर : शहरातील विविध प्रभागात अंदाजे ११ ठिकाणी जवळपास ६० लाखाची मोठा निधी न. प. सहाय्य अनुदानातून गडचांदूर शहरवासींनी कधी न पाहिलेले ग्रीन जिम साहित्य लावण्यात आले परन्तु नगराध्यक्ष यांनी त्याची कुठलेही उदघाटन बॅनर, पोस्टर्स,व्हाट्स अप ,फेसबुक वर साधे फोटो सुद्धा प्रसिद्ध केले नाही कुठला गवगवा केलेला नाही. त्यावरून गडचांदूर शहरातील जनतेत एक चांगल्या प्रतिमेच्या नगराध्यक्ष म्हणून नवीन ओळख निर्माण झाली,
वाढीव दरामध्ये गडचांदूर शहरात न.प‌. ने मंजुरी दिली असल्याचे सांगण्यात येते. ५० ची वस्तू १५० मध्ये व अनुभव नसलेल्या पक्षाच्याच माणसांना पेटी कंत्राट पद्धतीने कामे देण्यात गडचांदुर न. प. जिल्ह्यात अग्रेसर आहे, यांची कल्पना आता गडचांदूर शहरवासियांना आली असल्यामुळेच "कोणीही दुधातले धुतले नाही." हे सत्य गडचांदूरवासीयांसमोर आलेले आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी गवगवा न करण्याची सावधगिरी बाळगली, अशी चर्चा आत्ता गडचांदूरमध्ये सूरू आहे.
कुठलेही नेते विकास कमी परन्तु गवगवा मोठा करत असताना दिसतात.परन्तु अर्ध्या कोटीहून अधिक आणलेल्या कामाचे उदघाटन न करता जिम लावण्यात आले.असे नेते " लाखात एक"म्हणी प्रमाणे आम्हच्या नगराध्यक्षा ठरल्या व जनतेकडून त्यांची स्वच्छ प्रतिमेच्या नगराध्यक्ष अशी त्यांनी ओळख निर्माण केली.अनेक लोकांनी त्याचे अभिनंदन पण केले. परन्तु काही सूज्ञ नागरिक मात्र या प्रकारामुळे संभ्रमात पडले.
केंद्र असो की राज्य, ग्राम पंचायत असो वा नगर परिषद सर्व ठिकाणी एखाद्या लोकप्रतिनिंधी जर विकासाच्या दृष्टीने एखादे काम मंजूर करून दिले की, त्याचे मोठमोठे पोस्टर बॅनर लावणे, व्हाट्सअप, फेसबुक, वृत्तपत्र, टिव्हीद्वारे प्रसिद्धी करणे, मोठ्या थाटामाटात उदघाटन,भूमिपूजन लोकार्पण सोहळे साजरे करणे,जेणेकरून विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी हा यामागचा उद्देश असतो. ही राजकारण्यांची सवय असून याच पार्श्वभूमीवर गडचांदूर येथे नगरपरिषदेकडून शहरात सुरू असलेल्या कामांचे यापूर्वी भूमिपूजन, उद्घाटन झाले. त्याची प्रसिद्धी करण्यास कुठेही कमी पडू दिले नाही.
मात्र अखेर कां नाही केले नगराध्यक्षांनी उदघाटन यावर विरोधी नगरसेवकांनी नजर फिरवली असता त्यात मोठे घबाड असल्याचे लक्ष्यात आले व विरोधी नगरसेवकांनी थेट जिम लावल्या ठिकानी जिम साहित्याचे नाव व समोर त्याची किंमत टाकून बॅनर लावुन भांडाफोड केला व नगराध्यक्षांच्या प्रामाणिक पणाचा "बुरखा" फाडला व त्यामुळेच त्या जिमचे उदघाटन न करता जिम लावण्यात आल्याचे लक्ष्यात आले.
आता जी जनता प्रशंसा करताना दिसत असणारी जनता लावण्यात आलेल्या बॅनर व लिहिलेले "जरा जपून वापरा लई महागडा आहे" " कुठे नेवुन ठेवशील गडचांदूर माझा" हे वाचून थक्क झाले.अरे बापरे बाप हे तर खूप झाले.
म्हणत डोके धरून झालेल्या चुकी बद्दल पश्चाताप करीत असल्याचे बोलले जात आहे.