मुल तालुक्यातील जवळच असलेल्या चिचोली गावातील शेतकरी आपले गुरे राखीत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने राजेंद्र ठाकरे नामक युवकास ठार केले.
प्राप्त माहितीनुसार असे कि,चिंचोली गावातील शेतकरी राजेंद्र नामदेव ठाकरे वय वर्षे ४०हे आपले शेतीचे कामे आटपून दुपारच्या सुमारास शेताजवळ बैल चारत बसले होते.अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने राजेंद्र ठाकरे यांच्यावर हल्ला केला,व दुरवर जंगलाच्या दिशेने फरफटत नेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला,या घटनेमुळे ठाकरे कुटुंबीयावर व परीसरात शोककळा पसरली आहे.