▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

महाराष्ट्र वनविभागात मोठे फेरबदलवनविभागात बदलीचे वारे संचारले असून नागपुरातील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक असलेले महीप गुप्ता यांची चंद्रपूरच्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व चंद्रपूर वन अकादमीच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक व क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांची मंत्रालयात महसूल व वन विभागाच्या सहसचिवपदी बदली करण्यात आली आहे. रामगावकर यांच्या जागी पुण्याचे एस. रमेशकुमार यांची नियुक्ती झाली आहे.

त्याचप्रमाणे, प्रशासकीय करणास्तव गडचिरोलीचे विभागीय वन अधिकारी हे पद चंद्रपूर वन अकादमीमध्ये वर्ग करण्यात आले असून या पदास अपर संचालक असे घोषित केले आहे. या पदी मेळघाटच्या उप वनसंरक्षक पियुषा जगताप यांची चंद्रपूर वन अकादमीच्या अपर संचालक(प्रशिक्षक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक अविनाश कुमार यांची चंद्रपूर वन अकादमीच्या अपर संचालक(प्रशासन) पदी नियुक्ती झाली आहे. वाशिमचे उप वनसंरक्षक सुमंत सोळंके यांची मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल विभागाच्या उप वनसंरक्षकपदी बदली करण्यात आली आहे. गोंदियाच्या विभागीय व्यवस्थापक दिव्या भारती यांची मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना विभागाच्या उप वनसंरक्षकपदी नियुक्ती झाली आहे. तर ब्रम्हपुरीच्या विभागीय व्यवस्थापक अदिती भारद्वाज यांची विनंती अर्जानुसार नागपूरच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात उप वनसंरक्षकपदी बदली करण्यात आली आहे. या सर्व बदल्या प्रशासकीय करणास्तव केल्याचे कळते.