महानिर्मितीच्या त्या बोगस जाहीरातीचे कनेक्शन चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमध्येचं ?चंद्रपूर : शुक्रवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त खप असलेल्या एका प्रादेशिक वर्तमानपत्रांमध्ये चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्पेशल मध्ये डाटा ऑपरेटरच्या पदाकरिता नियुक्ती करण्यात येणार असल्याची जाहिरात प्रकाशित झाली होती, सदर जाहिरात या प्रादेशिक वर्तमानपत्राच्या मुख्य पानावर लागल्यामुळे ती विश्वासार्हय आहे असे गृहीत धरले जाते. परंतु सदर नियुक्ती संदर्भात अनेकांनी चंद्रपूर क्रांतीची संपर्क केल्यानंतर या जाहिरातींची विश्वासनियता पडताळणीसाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारणा करण्यात आल्यानंतर सदर जाहिरात चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन यांनी दिलीच नाही असे सांगण्यात आले. त्या संदर्भात अधिकृत खुलासा चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन करायला हवा असा आग्रह केल्यानंतर त्या ही ती जाहिरात बोगस असल्याच्या अधिकृत कागदोपत्री खुलासा चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन केला. सदर जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर अनेक बेरोजगारांनी चंद्रपूर सूपर थर्मल पॉवर स्टेशनमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केल्याची विश्वसनीय माहिती आहे. सदर प्रकरणाची तक्रार चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये केल्याचे या खुलास्यांमध्ये सांगण्यात येत आहे. सदर जाहिरात घोटाळ्यात चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी समाविष्ट आहेत काय? याचा ही तपास ctps च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करायला हवा.
जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन उर्जानगर येथील काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने सगळ्यात जास्त खपाच्या प्रादेशिक वृत्तपत्राला दि.८ ऑक्टोबर २०२१ रोजी महानिर्मिती महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित उर्जानगर या नावाने डाटा ऑपरेटर या पदाकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने रेज्युम नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असून त्या बाबतचे सविस्तर सुचना महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या http://www.maha.ganco.com या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही या जाहिरातीत सांगितले आहे. त्यामुळे अनेक बेरोजगारांना आपल्या हाताला काम मिळेल या उद्देशाने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या मात्र ती जाहीरातच बनावट असल्याचे कळताच अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला,ही जाहिरात एका प्रसिद्ध ख्यातनाम दैनिकांत प्रसिद्ध झाल्याने ही जाहिरात बनावट असू शकतच नाही असे अनेकांना वाटत होते.मात्र ही जाहिरात बनावट असून सदर जाहीराती बाबत महानिर्मिती कंपनीचा काहीही संबंध नसून सदर जाहीरातीस अनुसरुन कुणीही अर्ज सादर करू नये याबाबत महानिर्मिती कंपनी जबाबदार नसल्याचे महानिर्मिती कंपनीतर्फे खुलासा व्दारे सांगण्यात आले आहे.
या जाहीरात प्रकरणी एका मधस्ती व्यक्ती व्दारे वारंवार महानिर्मितीच्या एका उच्चभ्रू अधिकाऱ्यांसोबत वार्तालाप करून बेरोजगारांना फसवण्याचे षडयंत्र चालू आहे.जाहीरात देणारी व्यक्ती ही काही बुरखा पांघरून त्या वृत्तपत्रांच्या कार्यालयात गेले नाही किंवा ती जाहिरात फ्री मध्ये लावण्यात आलेले नाही.त्यामुळे ती जाहिरात देणारी व्यक्तीची कसून चौकशी केल्यास खुप मोठे मासे गळाला लागल्याची शक्यता आहे.चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे.आपल्याच मर्जीतील कंत्राटदाराला कंत्राट देऊन त्यावर लाखोंची मलाई खात आहे एकच कंत्राट दोन ते तीन वेळा काढून त्याच कंत्राटदाराला ते कंत्राट देण्यात येते.त्यामुळे "तेरी भी चूप मेरी भी चूप" असे करीत त्या कंत्राटावर पांघरून घालण्यात येते. त्या बोगस जाहीरातीचे प्रकरणही अश्याच पध्दतीचे असल्याचे बोलल्या जात आहे.या प्रकरणात पोलिसांनी जोरकसपणे उच्चस्तरीय चौकशी केल्यास थर्मल पॉवर स्टेशन चे उच्च अधिकारी अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.