ब्रेकिंग न्यूज:-बिबटयाच्या हल्ल्यात ७ वर्षीय मेंढपाळ बालक ठार

गोंडपिपरी :- तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील मेंढपाळ (कुरुमार) बांधव गोंडपिपरी तालुक्यात लगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी परिसरात एकसंबा मार्कंडा येथे उदरनिर्वाहासाठी मेंढ्या चराई करण्याकरिता गेले होते एफडीसीएम कक्ष क्रमांक 217 मध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक सात वर्षीय बालक मनोज तिरुपती देवेवार या बालकावर हल्ला चढवला त्यात त्या बालकाचा जागीच मृत्यू झाला बालका वर हल्ला चढवला पूर्वी त्या बिबट्याने एका मेंढीला हि ठार केले त्यानंतर त्या बालकावर हल्ला केला त्या बालकाच्या आईला आपले बाळ दिसत नसल्याचे पाहून तिने आरडाओरडा केला तेव्हा त्यांचे आजोबा या दिशेने धावत गेले मात्र तोपर्यंत त्या बिबट्याने त्या बालकाला जंगलात फरफटत नेऊन ठार केले या घटनेमुळे देवेवार परिवारावर खूप मोठे संकट ओढवले आहे घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आष्टीचे सरपंच पंदीलवार, राकेश बेलसरे जि. प. सदस्य, मला अम्मावार, मारुती अम्मावार माजी उपसरपंच यांनी घटनास्थळी धाव घेत त्या परिवाराला त्वरित नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली