त्या पत्रकारांचे बातमीत नावच नाही तर त्याची बदनामी झाली कशी?




चंद्रपूर प्रतिनिधी :-

दोन दिवसापूर्वी भूमिपुत्राची हाक या न्यूज पोर्टल वर चंद्रपुरातील एका स्थानिक बारमध्ये चिकन उचलल्यामुळे पत्रकारांनी मार खाल्ला या आशयाची बातमी प्रकाशित झाली होती. त्या बातमीची शहरात व जिल्ह्यात मोठी चर्चा झाली होती मात्र त्या बातमीत तो मार खाणारा व पळून पत्रकार नेमका कोण याबद्दल गोपनीयता पाळली गेली होती मात्र "उंट पहाड पर आताही है" असे जे म्हटल्या जातंय ते अगदी खरं असून शेवटी त्या पत्रकारांची बदनामी झाल्याची सबब पुढे करून त्या तथाकथित पत्रकाराने काही पोर्टल च्या संपादकांना बातमी चा स्त्रोत काय? असे विचारून स्वतःचा हशा करून घेतला कारण जो व्यक्ती एवढी वर्ष पत्रकारिता करतोय तो व्यक्ती जर असे बातमीचा स्त्रोत काय? हे विचारत असेल तर मग आता त्यांच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे कारण कायद्यानुसार छापलेल्या किंवा प्रकाशित झालेल्या बातमीचा स्त्रोत सांगणे बंधनकारक नाही आणि कुणी असा स्त्रोत विचारात सुद्धा नाही.


खरं तर सदर भुमीपुत्राची हाक चे संपादक या न्यूज पोर्टल च्या व चंद्रपूर क्रांती या न्युज पोर्टल च्या
बातमीत कुणाचे नाव जाहीर केले नाही किंवा तसे उपरोधिक नाव पण दिले नाही पण जे खरंच चिकन चोर आहे त्यांच्या मात्र ही बातमी जिव्हारी लागली आणि त्यांनी जिकडे तिकडे पोर्टल च्या संपादकांना फोन करून बातमीचे स्त्रोत विचाराने सुरू केले. महत्वाची बाब म्हणजे न्युज पोर्टलवर कुणाचेही नांव न टाकता बातम्या प्रकाशित होत आहे व एखादा मोठा पत्रकार हे माझ्याच बद्दल आहे व माझी बदनामी होत आहे असा आशय घेऊन संपादकांना फोन करत असेल तर ही बाब फार गंभीर आहे, त्या मोठ्या पत्रकाराने स्वतःचं विचार करावा ज्या घटनेमध्ये तो नाहीच तर त्याने गांभीर्याने कां बरे घ्यावे? आम्ही समजतो कायदा आमचे मानते अधिकारी असं जर तो गृहीत धरत असेल तर तो स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहे आणि हलकट पनाचे संपूर्ण हद्द तो पार करत आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे. तक्रारी झाल्या तरी चालतील पण अशांना पुरून उरणारे आम्ही संपादक आहोत हे त्यांनी ध्यानात घ्यावे. चंद्रपूर क्रांती या वर्तमानपत्राचे आम्ही संपादक आहोत, एखाद्या संपादक कडे काम करणारे हे आहेत, आम्ही स्थानिक असलो तरी आम्ही एखाद्या वर्तमानपत्राचे स्वतः मालक आणि संपादक आहोत. हे अश्या चिकणचोर पत्रकारांनी  विसरू नये. चुकी करणाऱ्यांनी गप्प रहाण्यातचं शहाणपण आहे. "पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची" याचा या मांजरांना विसर पडला असेल, हरामाची खाऊन "बोके" झालेल्यांना स्वतः: वाघ होण्याचा आभास होत असेल तर ती चुक त्यांनी आत्ताचं सुधारावी, "झाकली मूठ सव्वालाखांची" म्हणून थंड बसायला हवे होते मात्र ते बंडा चे निशाण घेऊन नसले उपद्व्याप करीत असल्याने हे प्रकरण येणाऱ्या काळात गंभीर वळण घेऊ शकते असे संकेत मिळत आहे.
.