गडचांदुर- अख्या महाराष्ट्रात औधोगीक नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे,गडचांदूर शहरातील नगरपरिषद सध्या नाना कारणाने सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.याठिकाणी सुरू असलेले नगर परीषद चे कारभार नागरिकांना अक्षरशः डोकेदुखी ठरत असून अखेर यांत नेमकं चाललय तरी काय ? हे कळायला मार्गच उरलेला नाही.विविध माध्यमातून शहरवासी नगरपरिषदेच्या नावाने शिमगा घालत असून "नगरपरिषदेकडे प्लॅनिंगच नाही,पैसा आहे,खर्च करणे एवढेच प्लॅनिंग आहे" अशाप्रकारे सत्ताधाऱ्यांना घरचा अहेर दिला जात आहे.यांच्याबाबतीत बोलायचे झाले तर "काही अपवाद वगळता लोकांची समस्या धुऱ्यावर,कारभारी माऱ्यावर" अशा उपहासात्मक टीकांसह याठिकाणी मोजकेस विरोधी नगरसेवक आपली भुमिका सक्षमपणे वठवतांना दिसतात.असे असताना नुकतीच विशेष सभा बोलावून इतर विषयांसह नवीन दारू दुकानाला नागरिकांचा विरोध झुगारून देण्यात आलेला ना-हरकतचा विषय सध्या कमालीचा गाजत आहे.
ज्याठिकाणी नवीन दारू दुकान सुरू होणार आहे त्या मार्गावर अवघ्या काही अंतरावर "कन्या विद्यालय" व "क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके" चौक आहे.आणि मागील वर्षी १५ आक्टोंबर २०२० रोजी आयोजित सर्वसाधारण सभेच्या विषय सुचितील विषय क्रं.४ हा सदर चौकाचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरणाचा होता.त्यावेळी हा विषय सर्वानुमते मंजूर सुद्धा करण्यात आला.व न.प.कडे १४ वित्त आयोग निधी उपलब्ध असताना सुध्दा जाणीवपुर्वक या चौकाचे काम करण्यात आले हे विषेश आता नुकतेच "क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके" चौकाला लागुन श्री लांजेकर यांना नव्याने देशी दारु दुकानाकरीता नाहरकत दिले त्यावेळेस अनेक तेथील नागरीकानी व विरोधी नगरसेवकांनी कडाडुन विरोध केला.ज्या जनतेनी त्यांना शहराच्या प्रथम नागरीकांचा मान दिला.त्यांच्याच भावनेचा विचार न करता दारु दुकान नाहरकत प्रमाण पत्र दिले.त्या ठीकाणी दारु दुकान चालु होतील तेव्हा नेहमी सकाळी ,सायंकाळी फेरफटका मारणारे प्रौढ महीला ,पुरुषांना तसेच त्या चौकातुन कन्या विद्यालयाच्या विध्यार्थीनी ये- जा करणाऱ्यास मोठा मनस्ताप होणार आहे.त्यामुळे या नगराध्यक्षा विरुध्द शहरात नाराजीचा सुर ऐकायला मीळत आहे.त्यामुळे जनतेला शांत करण्याकरीता येत्या ३० जुलैला आयोजित सर्वसाधारण सभेत " क्रांतीविर शहीद बाबुराव शेडमाके चौकाचे सौंदर्यीकरण करण्याबाबतचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला आहे.या आधीच सभेत ठराव मंजुर झाला असताना परत सभेला विषय ठेवण्याची का गरज हे निव्वळ जनतेची दिशाभुल करण्याचा नगराध्यक्षांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा घनघनीत आरोप भाजपा पक्षाचे विरोधी नगरसेवक अरविंद डोहे यांनी केला आहे.
सदरचा प्रकार हा देशी दारू दुकानाच्या विषयावर पडदा टाकण्यासाठी शहीद बाबुराव शेडमाके चौकात सौंदर्यीकरण व सुशोभीकरणाचा विषय पुन्हा घेवुन प्रभाग क्र.५ च्या रहिवासीयांची दिशाभूल करण्याचा तसेच एका विशिष्ट समाज बांधवांच्या जखमी भावनांवर फुंकर घालण्याचा व सहानुभूती घेण्याचा प्रयत्न नगराध्यक्षांकडून केला जात असल्याचाही थेट आरोप विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांनी केला आहे.