लॉ कॉलेज ते चव्हाण कॉलनी दरम्यान जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करून स्ट्रीट लाईट लावण्याची आमदार श्री किशोरभाऊ जोरगेवार यांचेकडे मागणी..राकेश नाकाडेस्थानिक छत्रपती नगर, तीर्थरूप नगर येथील रहिवाशी यांना तुकुम परिसरात जाण्याकरिता तथा बंगाली कॅम्प जाण्याकरिता तसेच कोणत्याही कामाकरिता ये जान करण्यासाठी लॉ कॉलेज ते चव्हाण कॉलनी जाणरा रास्ता सोईचा आहे. तसेच या मार्गाने तुकुम परिसरातील तथा सरकार नगर परिसरातील नागरिक मोठया संख्येने मॉर्निंग वॉक इविनिंग वॉक करिता येत असतात तसेच विद्यार्थ्यांना शाळेकरिता , ट्यूशन करीता सुद्धा याच मार्गाने जावे लागते. या मार्गावर दोन्ही बाजूने झुडपे तयार झालेले आहे . लॉ कॉलेज च्या गेटजवळ तुकुम परिसरातील कचरा संग्रहित करण्याचे काम सुध्दा केले जाते त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. तसेच अस्वल सारख्या जंगली प्राण्यांचा वावर सुद्धा याभागत होताना दिसतो. स्ट्रीट लाईट नसल्याने अंधारात जाता येताना या भागातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. अंधाराचा फायदा घेऊन एखादी अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सोई करीता रस्त्याची दुरवस्था दूर करून स्ट्रीट लाईट लावण्याच्या मागणीचे निवेदन मा. आमदार श्री किशोरभाऊ जोरगेवार यांना देण्यात आले. व सदर प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन सुद्धा मा. आ. किशोरभाऊ जोरगेवार यांनी दिले. निवेदन देतांना श्री राकेश नाकाडे , श्री सचिन चलकलवार, श्री प्रसाद खाडिलकर , श्री विपीन येलमुले आदींची उपस्थिती होती.