डाॅ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान स्मृतीदिनानिमीत्य भाजपा गडचांदुर च्या वतीने श्रध्दांजलीचा कार्यक्रम संपन्नगडचांदुर - प्रखर राष्ट्रभक्त देशप्रेमी राष्ट्रनायक भारतीय जनसंघाचे संस्थापक अधक्ष डाॅ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी गडचांदुर च्या कार्यालयात भाजपा जेष्ट नेते मा. शिवाजीभाऊ सेलोकर यांचे हस्ते
डाॅ श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे प्रतीमेचे पुजन करून पुष्पहार अर्पन करून श्रध्दांजली वाहली व डाॅ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जिवन शैलीवर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,डाॅ.श्यामा प्रसाद मुखर्जी हेभारतीय जनसंघाचे संस्थापक अधक्ष म्हणुन उत्तम रीत्या कार्य पार पाडले व जनसंघाला शिखारावर नेवुन ठेवण्याचे मोठे योगदान दिले व एक छाप निर्माण केली.नेहमी ते आपल्या मनोगतात म्हणत होते की,एक देश मे दो प्रधान,दो विधान,और दो निशान नही चलेंगे असे म्हणणारे डाॅ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांना उपस्थीतानी नमन करून पुष्पहार अर्पन करुन श्रध्दांजली वाहली.
तसेच प्रभाग क्र दोन येथील नगरसेवक श्री अरविंद डोहे यांचे घरी व ईतर प्रभागात सुध्दा श्रध्दांजली कार्यक्रम पार पडला.त्यावेळी भाजप नेते शिवाजीभाऊ सेलोकर,शहर अधक्ष सतीश उपलेंचवार ,निलेश ताजने, अरविंद डोहे,हरीश घोरे सौ विजयालक्ष्मी डोहे,सौ कल्पनाताई जोगी,सौ शारदाताई क्षीरसागर,रामसेवक मोरे, अरविंद कोरे,अजीम बेग,ईम्रान पाषा,मयूर खान कुणाल पारखी गणपत बुरडकर, हरीभाऊ मोरे,परशुराम मुसळे सुयोग कोंगरे सुरेशकुमार आदिंची उपस्थीती होती.