कोरपना तालुक्यातील गडचंदुर परिसरात मागील काही वर्षांपासून आदिवासी बांधवांच्या जमिनी कवडीमोल दरामध्ये खरेदी करून त्या विक्री करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे गडचांदूर मधील एक बिल्डर लोबी या या कार्यात सक्रिय असून आदिवासी बांधवांनी कोणत्याही लोभात न पडता कवडी मुद्दा दामाने आपल्या जमिनी प्रमाणावर विक्री करू नये व आमिषाला बळी न पडता सदर प्रकार घडत असल्यास व कोणाचाही दबाव येत असल्यास तत्संसंबंधाने तक्रारी करण्यास समोर यावे कवडीमोल दामाने जमीन विकली व ती ज्या "चोट्याने"व खरेदी केली ती जमीन आज गडचांदूर मध्ये चौथा विक्री करीत आहे, बिल्डर लॉबी सक्रीय झालेली आहे, आदिवासी बांधवांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता धोका देणारे व दिशाभूल करणारे व्यवहार होत असल्यास संपर्क साधावा.
सविस्तर. वृत्त असे की, कोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव आपल्या जमिनी अल्प दरामध्ये काही बिल्डरांना विकत आहेत. आदिवासी बंधूंनी आपल्या जमिनी यानंतर अल्प दरामध्ये विकुच नये. जे भुमाफिया त्यांच्या जमिनी अल्पदरात घेऊन मोठा व्यवसाय करीत आहे त्यांच्यावर तर कारवाई होणारच आहे परंतु जे आपल्या जमिनी अल्पदरात विकत आहेत त्या आदिवासी बांधवांवरही या काळात कारवाई होणार, हे निश्चित आहे. आदिवासी बांधवांनी आपल्या जमिनी अल्प दरात विकु नये. असे आव्हान यानिमित्ताने करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे कोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरात असा व्यवहार फार मोठ्या स्तरावर सुरू आहे, तो त्वरित बंद व्हावा अन्यथा जमीन खरेदी करणाऱ्या सोबतच विक्री करणाऱ्यांवर ही कारवाई होण्याचे संकेत शासनाने दिले आहेत.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरामध्ये आदिवासींची जमीन अल्पशा रकमेमधून घेऊन ती मोठ्या रकमेमध्ये विकण्याच्या गोरख धंदा मागील काही वर्षापासून सुरू आहे.
लॉकडाऊननंतर उद्भवलेली परिस्थिती बघता अनेक आदिवासींनी आपल्या जमिनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विक्री करून घेण्यात आले आहेत, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विक्री करण्यात आलेल्या या जमिनींच्या सौदा रद्द करण्यात यावा ज्यांनी या खरेदी केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. चंद्रपूरच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी गडचांदूर मध्ये कवडीमोल दराने विक्री झालेल्या या जमिनींचे सौदे रद्द करावी व त्वरित खोटे दस्तऐवज सादर करून जमिनी खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर या औद्योगिक वस्तीमध्ये अनेक आदिवासी बांधव आपल्या जमिनी अल्पशा दरांमध्ये विकत आहे. यापूर्वी असे अनेक प्रकार घडले आहेत आता असे प्रकार घडल्यास खरेदी करणारे आणि विक्री करणारे हे दोन्ही वादांमध्ये येऊ शकतात तसा नियम शासनाने एक समिती बनविली असून लवकरच या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्र सोबतच कोरपना तालुक्यातील गडचांदूर मध्ये हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे याचीही उच्चस्तरीय चौकशी बसणार असून खरेदी करणाऱ्या सोबत विक्री करण्यावरही गुन्हे दाखल करण्यात येतील अशी अधिकृत माहिती मिळाली आहे.