पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे आयुष्य स्त्रीकर्तृत्वाची उंची सांगणारे होते.अतिशय दानशूर,कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून त्यांचे नाव सुवर्ण अक्षराने इतिहासात नोंदल्या गेले आहे.त्यांचे कर्तृत्व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,असे प्रतिपादन माजी वित्तमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले . ते भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्य सोमवार दिनांक (३१ मे) ला आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महामंत्री राजेंद्र गांधी,ब्रिजभूषण पाझारे,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,सचिव रामकुमार कापेलिवार,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,शुभम शेगमवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी आ. मुनगंटीवार यांचे हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
आ.मुनगंटीवार म्हणाले,राजमाता अहिल्यादेवीचा जन्म धनगर समाजात झाला.त्यांनी अनिष्ठ प्रथांना छेद दिला.त्या चाणाक्ष व सुधारणावादी राज्यकर्ती होत्या.
यावेळी आदरांजली अर्पण करीत,डॉ गुलवाडे म्हणाले,कुशाग्रबुद्धीची देणगी मिळालेल्या राजमाता अहिल्यादेवींनी पूर्वीच्या कायद्यात परिस्थितीनुसार अनेक बदल करून त्यांनी कर पद्धती सौम्य व सुलभ केली.गावोगावी त्यांनी न्याय देणारे पंच नेमले वस्त्रोद्योगास त्यांनी प्रोत्साहन दिले.प्रवाशांसाठी त्यांनी पानपोया,धर्मशाळा,पांधशाळा,आश्रय शाळा उभारल्या.त्यांनी राज्यखर्चातून चिरेबंद विहिरी खोदून लोकसेवेत दिल्या.त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.यावेळी राजेंद्र गांधी,विशाल निंबाळकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले.