▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

अवैध दारु विक्रेत्यां विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कसली कंबरचंद्रपूर (प्रति.)
मंगळवार दिनांक 25 मे रोजी चंद्रपुरच्या एलसीबी पथकाने गडचांदूर रेल्वे फाटक समोरील राजूरा जाणा-या रोडवरील सना पेट्रोल पम्प, समोर ट्रक क्र MH 29 BE 2289 बारा चक्का ट्रकमध्ये 38400 र. किंमतीच्या एकूण 192 निप्पा, प्रत्येकी 180 ML देशी दारू रॉकेट संत्रा कंम्पनिच्या लहान चापट प्लॉस्टीकच्या सिलबंद शिश्या प्रत्येकी 200 रू प्रमाणे कि. 3,10000 रू एकूण 31 खर्डाच्या खोक्यात एकूण 3100 निप्पा प्रत्येकी 90 ML. देशी दारू रॉकेट संत्रा दारू व अशोक ले-लॅंड कंपनीचा 17,00000 रू. किंमतीच्या ट्रक असा एकंदर 20 लाख 48,400//- रूपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त केला. चंद्रपूर गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय आतकुलवार, पो.कॉ. कुंदन सिंग, नितीन रायपुरे, संजय वाढई, गोपाल आतकुलवार यांनी ही कारवाई केली.
सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूरच्या एलसीबी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राजूरा जाणा-या रोडवरील सना पेट्रोल पम्प, समोर ट्रक क्र MH 29 BE 2289 ताडपत्री झाकुन दारू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून एलसीबी च्या पथकाने कारवाई केली असता रेल्वे क्रॉसिंग जवळ ट्रक आढळला, ट्रक ची पाहणी केली असता त्यामध्ये दारू साठा उपलब्ध होता. सदर प्रकरण गडचांदूर पोलीस स्टेशन मध्ये सादर करण्यात आले असून ट्रक चालक व अन्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.

गडचांदुर पोलिसांची भूमिका संशयास्पद !
गडचांदूर मध्ये मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत आहे परंतु गडचांदूर पोलीस याकडे कानाडोळा करत असून दारू तस्करांची गडचांदूर पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांचे हितसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतीच एलसीबी ने केलेली कारवाई गडचांदूर पोलीस सुद्धा करू शकली असती परंतु दारू तस्करांची असलेले संबंध जोपासण्यात गडचांदूर पोलीस नेहमी अग्रेसर असतात. गडचंदुर शहरात ट्रकने दारू पुरवठा होतो आणि त्याची पुसटशी कल्पनाही गडचांदूर पोलिसांना नाही ही आश्चर्याची बाब आहे. आता एलसीबी ने केलेल्या कारवाईनंतर आरोपींना गडचांदूर पोलीस संरक्षण देते की अटक करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.