परवानगी नसतानाही चंद्रपूर-नागपूर प्रवाश्यांना ज्यादा दर आकारून होत आहे प्रवास !



चंद्रपूर : आत्ताच्या लाकडाऊनमध्ये परिवहन मंडळाच्या बसेस ला निम्यामध्ये व अत्यावश्यक सेवेसाठी प्रवाश्यांना परवानगी देण्यात आली आहे परंतु चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खाजगी बसेस कोणतीही परवानगी न घेता प्रवाशांची वाहतूक करीत आहे, यामध्ये चंद्रपूरातील वादग्रस्त असलेले DNR ट्रॅव्हल्स हे अग्रस्थानी आहे. यापूर्वी या ट्रॅव्हल्स कंपनीवर अनेकदा वेगवेगळ्या प्रकरणात कारवाया करण्यात आल्या आहेत व गुन्हे ही दाखल झाले आहेत. नुकतेच 28 एप्रिल ला एका प्रवाशाने कोणतीही चाचणी न करता व परवानगी न घेता DNR ने नागपूर गाठले, यासाठी त्याला चारशे रुपये द्यावे लागले व दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 ला हा प्रवाशी पुन्हा नागपूर हुन चंद्रपूर ला परत आला व चारशे रुपये नागपूरहून चंद्रपूर साठी आकारण्यात आले. परिवहन मंडळाच्या बसेस या सुद्धा सुरूवात ई-पास ने केली आहेत, मग खाजगी बस मध्ये जादाची शुल्क आकारणी करून प्रवासी प्रवास कसे करत आहेत या संदर्भात RM media centre ने तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली. चंद्रपूर नागपूर याठिकाणी खाजगी बसने प्रवास होत आहे. DNR ट्रॅव्हल्स यामध्ये अग्रस्थानी आहे.


DNR ला दिली यापूर्वी दोनदा मेमो दिल्याची आरटीओ नी दिली माहिती !

चंद्रपूरचे आरटीओ किरण मोरे यांच्याशी यासंदर्भात भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी खाजगी बसेसला अशी कोणतीही परवानगी त्यांच्या विभागाकडून देण्यात आली नाही आणि तो अधिकार त्यांच्या विभागाला नसून शासनाचे व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पालन करीत निर्देशानुसार पालन करण्यात येत आहे. असे स्पष्टपणे सांगितले. आपल्या पशी या संबंधात काही पुरावे असल्यास त्याची माहिती आम्हाला द्यावी कारवाई करण्यात येईल असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले तसेच DNR ट्रॅव्हल्स ला यापूर्वी मेमो देण्यात आला असून असे कागदपत्र असल्यास आम्हाला सादर करावे आम्ही अवश्य कारवाई करू अशी माहिती त्यांनी दिली.

RM media centre ने याबद्दल स्ट्रींग ऑपरेशन केले या स्टिंग ऑपरेशन प्रवास करणाऱ्या व्यक्ती व होणारी चौकशी याची माहीती collect केली चंद्रपूर ते नागपूर जाते पर्यंत किंवा नागपूर हुन चंद्रपूर येथे पावेतो कोणत्या पद्धतीची चौकशी केली जात नाही किंवा पाच सुद्धा तपासले जात नाही अशी धक्कादायक बाब समोर आली आहे‌. चंद्रपुरात असे अनेक ट्रॅव्हल धारक आहेत, जे नियमांची पायमल्ली करीत चंद्रपूर ते नागपूर जादा दर आकारुन प्रवासी वाहतूक करीत आहे. रस्त्यावर चालणार्‍या ट्रॅव्हल्स धारकांना किंवा खाजगी वाहन धारकांवर कारवाई करण्याचे अधिकार हे प्रादेशिक परिवहन विभागाला आहेत जर त्यांच्या नजरेखालून अशा बसेस निघत असेल व त्या ठिकाणी आर्थिक उलाढाल होत असेल व कोरोणा रुग्णांची संख्या नियंत्रणात येत नसेल तर या जबाबदार अधिकाऱ्यांवर चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवे अशी मागणी पत्रकार संघाद्वारे जिल्हाधिकार्‍यांना करण्यात येत आहे. सोबतच्या वृत्तासोबत प्रवास करणारे प्रवासी, त्यांचे काही फोटो व तिकीट सादर करीत आहे. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी व फक्त ट्रॅव्हल धारकांनाच नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवरही दंडात्मक व फौजदारी गुन्हे दाखल करावेत, जेणेकरून जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रण राहू शकेल.

मागील तीन दिवसांपासून चंद्रपुरात होत आहे दारू चा खुलेआम पुरवठा !
महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लाॅकडाऊन केल्यानंतरही मागील तीन दिवसापासून दारूबंदी असलेल्या चंद्यपुर जिल्ह्यामध्ये नियमितरित्या दारूचा पुरवठा होत आहे. संबंधित अधिकारी वर्ग या ठिकाणी "कुठे मुंग गिळून बसला आहे. ते कळायला काही मार्ग नाही. सर्वसामान्यांना घरात बसा व निर्देशांचे पालन करा असे सांगणारी शासकीय यंत्रणा चुकीच्या मार्गाने होत असलेल्या अवैध व्यवसायावर आळा बसविण्यासाठी कां बरे निष्क्रिय होत आहे? याची चाचपणी लोकप्रतिनिधींनी अवश्य करायला हवी.