पंतप्रधान मोदींच्या गुजरात मध्ये रासप चा झेंडा !




राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी स्वताच्या घरात न जाण्याची शपथ घेत मी फक्त दिनदलीत ओबीसी,दिनदुबळ्यासाठी लढण्याचा विढा उचलत बहुजन समाज पक्षाचा त्याग करीत त्यांनी स्वपक्षाच्या झेंडा खांद्यावर घेतला.राष्ट्रीय समाज पक्ष आज वटवृक्षाप्रमाणे खुप मोठा झालेला दिसत आहे.२०१४मध्ये एनडीए सोबत घटक पक्ष म्हणून आजही मोठ्या ताकदीने उभा राहिला आहे. सन २०१४ मध्ये भाजपा शिवसेनेच्या युती करण्यात आली त्यात राष्ट्रीय समाज पक्षाला घटक पक्ष म्हणून जवळ घेण्यात आले .रासपाचे एक आमदार निवडून आले.युती करतांना रासपाला पहील्या यादीत कॅबिनेट मंत्री पद देण्याचा विश्वास देण्यात आला. मात्र भाजपा शिवसेनेने मात्र तब्बल तिन वर्षांनंतर पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी सांगितले मात्र महादेव जानकर हे आमदार नसल्याने त्यांना विधानपरिषदेत भाजपातर्फे उभे करण्याचे षडयंत्र रचल्या गेले.मात्र तेही महादेवच त्यांनी भाजपाचा पुर्ण षडयंत्र हाणून पाडला व स्वपक्षाच्या ऐबी फार्म वर निवडून आले.इतकेच नव्हे तर यापुर्वीही आमदार,जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायती स्वबळावर निवडुन आणले आहे. आता नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील पादरा वडोदरा नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे ऐतिहासिक विजय झाला असून रासपा चे एकुण ७ उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे.यापुर्वीही बडोदरा नगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले होते. ७नगरसेवक निवडुण आल्यामुळे विरोधीपक्षात बसावे लागले आहे.पादरा वडोदरा नगरपालिकेत एकुण २८ नगरसेवकांची संख्या आहे. त्यात भाजपाचे २१ उमेदवार निवडून आले तर राष्ट्रीय समाज पक्षाचे ७उमेदवार निवडून आले आहेत. क्राॅग्रेसला मात्र एकही जागावर कब्जा करता आला नाही.रासपचा डंका प्रत्येक राज्यात वाजु लागला आहे.येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्ष भारताच्या कानाकोपऱ्यात राजकीय बिगुल वाजवेल यात तिळ मात्र शंका नाही.