मेंढीचे दुध नियमित पिल्याने कर्करोग होत नाही_डाॅ.पाटीलकोल्हापूर, ता. ८. मेंढीचे दूध नियमित प्यायल्याने
कर्करोग होत नाही. या दुधापासून बनविलेली भुकटीही कर्करोगाला दूर ठेवू शकते, असे संशोधन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. अभिनंदन पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या संशोधनाची अमेरिकेतील एनसीबीआय या संस्थेने दखल घेतली आहे. या दुधातील कर्करोगास प्रतिकार करणाऱ्या सत्वहीन प्रथिने निर्माण करणाऱ्या सूक्ष्म जीवाणूचा त्यांनी शोध लावला आहे. या दुधातील सूक्ष्म जीवाणूंपासून तयार केलेल्या भुकटीपासून कर्करोगावर परिणामकारक ठरणारी औषधे बाजारात येणार आहेत.
या दुधातील सूक्ष्म जीवाणू आतड्यांचे ट्युमर नष्ट होण्यास मदत करतात. शिवाय भविष्यात आतड्याचा कर्करोग होण्याची शक्यता संपते,असे संशोधनातून पुढे आले,याचा पहिला प्रयोग उंदरांवर केला जो यशस्वी झाला. त्यानंतर त्यांनी दुधातील सूक्ष्म जीवाणूंपासून तयार केलेल्या औषधांमुळे कर्करोगावर उपचारही होऊ शकतात, असे निष्कर्ष मांडले. या संशोधनासाठी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजी पवार, डॉ. जॉन तसेच फार्मसी विभागातील आदर्श डिसूजा, डॉ. सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन मिळाले. डॉ. अभिनंदन कोल्हापूरचे. भारती विद्यापीठातून बी.फार्मचे शिक्षण घेतले.वारणानगर येथून एम.फार्म पूर्ण केले. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात पी.एचडी.चे संशोधन सुरू केले. तेथे त्यांनी नैनों फॉरमोकॉलॉजी म्हणजेच सूक्ष्म जीवाणूवर पाच वर्षे संशोधन केले. सध्या ते संजय घोडावत विद्यापीठात स्कूल ऑफ फार्मसीमध्ये कार्यरत असून मेंढीच्या दुधातील सूक्ष्म जीवाणूपासून कर्करोगावरील उपचार पद्धती या विषयावर तेथे संशोधन सुरू आहे. कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेतील निदान या विषयावर त्यांनी जपान मधील टोकियो विद्यापीठात शोधप्रबंध सादर केला होता. त्यांच्या या शोधनिबंधातील संशोधनाला प्रथम पुरस्कार मिळाला होता.तसेच फार्मसी विभागातील आदर्श विद्यार्थी म्हणून त्यांना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून राष्ट्रपती पुरस्काराने गौरविले होते.

आदमापुरातील मेंढ्यांच्या दुधात जिवाणू

विशेष म्हणजे, कर्करोगावर जालीम इलाज करणारे है दूध केवळ आदमापूर परिसरातील मक्यांमध्येच आवळते, असे संशोधनात स्पष्ट झाले आहे. डॉ. पाटील यांनी २०१६ - १७ साली आदमापूर परिसरातील मेंढ्यांच्या दुधाचा अभ्यास सुरू केला. दुधाचे संम्पल घेऊन त्यातील सूक्ष्म जीवाणूंचे जनुकीय पद्धतीने संशोधन केले. तसेच हे दूध नेहमी पिणार्या व्यक्तीचाही अभ्यास सातत्याने सुरू ठेवला,