माजी मंत्री व रासपचे महादेव जानकर यांनी केला मोठा गौप्यस्फोटपंढरपूर : राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रशांत पारिचारक येऊ शकतात. प्रशांत तिकडे राहिल तर उमेश परिचारक तर माझ्या पक्षामध्ये येऊ शकतात. असे बोलून महादेव जानकर यांनी पंढरपुरात राजकीय भूकंप केला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्या घरी सदिच्छा भेटीसाठी आले होते. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, माऊली सगर, पोपट क्षीरसागर, परमेश्वर पूजारी, आबासाहेब मोटे उपस्थित होते.

आ. गोपीचंद पडळकर राज्यभर दौरे करत आहेत. त्यांना भाजपा ओबीसीचा चेहेरा म्हणून पुढे करतात का ? असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर जानकर म्हणाले, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे ते त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी काम करत आहेत. मला साइड ट्रॅक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या पक्षामध्ये सर्व समाजाचे नेते आहेत. माझ्या पक्षात प्रशांत पारिचारक येऊ शकतात. प्रशांत तिकडे राहील तर उमेश परिचारक तर माझ्या पक्षामध्ये येऊ शकतात. असे स्पष्टीकरण जानकर यांनी दिले.