ग्रामपंचायत निवडणुक मानधन तात्काळ देण्याची शिक्षक परिषदेची मागणीमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक चंद्रपुर च्या शिष्टमंडळाने श्री.संपत खलाटे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेऊन ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मध्ये निवडणुक कार्यात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ मानधन देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
चंद्रपुर जिल्हयामधे फक्त गोंडपिपरी व बल्लारपुर तालुक्यात निवडणुकीत सेवा देणाऱ्या कर्मचारी यांना मानधन देण्यात आले. उर्वरित जिल्ह्यातील अन्य तालुक्यात कुठेही रोखीने मानधन देण्यात आले नाही. ही बाब निदर्शनास आणून दिली असता सर्व तालुक्यांना निवडणुकी साठी रक्कम उपलब्ध करुन देण्यात आली. यासंदर्भात सर्व तहसिलदारांना सुचना देण्यात आल्या असून लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना मानधन त्यांचे खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात येईल अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी शिक्षक परिषद प्राथमिक शिष्टमंडळाला दिली.
यावेळी चर्चेला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक अमोल देठे जिल्हा कार्यवाह,अजय बेदरे कोषाध्यक्ष,सुशांत मुनगंटीवार संघटनमंत्री,सतिष दुवावार,आनंदराव वेलादी,शंकर निखाडे उपस्थित होते.