कोरपना येथे महिला मेळावा व आत्मनिर्भर महिला संमेलन



कोरपना - स्त्री ही विश्वाची जननी आहे. त्यामुळे स्त्रीशक्ती ही सर्वश्रेष्ठ मातृशक्ती आहे असे मत राज्याचे माजी अर्थमंत्री व बल्लारपूर चे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कोरपना येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तर्फे आयोजित मकर संक्रांत उत्सव, महिला मेळावा व आत्मनिर्भर महिला संमेलन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
या प्रसंगी माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव सोपान कनेरकर,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे , महिला जिल्हा अध्यक्ष अल्का आत्राम,
माजी महापौर अंजली घोटेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, सतीश धोटे,सतीश उपलंचीवर,
भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर , जिल्हा सचिव विशाल गज्जलवार, नगरसेवक अरविंद डोहे, , नगरसेवक अमोल आसेकर,जिल्हा महामंत्री महेश देवकते , विवेक बोढे, नामदेव डाहुले,सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष किशोर बावणे,जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष आशिष ताजने ,जिल्हा सचिव ओम पवार , रमेश मालेकार,
, जिल्हा महिला महामंत्री विजयालक्ष्मी डोहे,जिल्हा सचिव इंदिरा कोल्हे , शायरा शेख,
आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले, महिलांनी आजच्या आधुनिक युगात सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे. त्यामुळे त्यांची आत्मनिर्भरते कडे स्वयंपूर्ण वाटचाल चालली आहे असे सांगितले. तत्पूर्वी कोरपना शहरातून भव्य रॅली काढण्यात आली होती.
कार्यक्रमाचे संचालन सोनाली रणदिवे यांनी केले.तर प्रास्ताविक विजयालक्ष्मी डोहे,व आभार प्रदर्शन रजिना शेख, यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजयालक्ष्मी डोहे,अल्का रणदिवे, जया धारणकर, कल्पना बावणे, शोभा आगलावे, वर्षा लांडगे, प्रियका पानघाटे, सोनाली आसेकर, सविता तुमराम, गीता डोहे, संगीता चींतलवर, जोशना वैरागडे, सीमा मोहितकर, पूजा देरकर , सरोज घोटेकर, मनीषा मालेकर, लता दगडी, मिरा मोडक, वैशाली कौरासे, ममता लेंडांगे , सुरेखा मुके, वर्षा पिंपळकर, सुमन परचाके आदीं महिला आघाडीच्या सदस्यानी सहकार्य केले.


मिशन सेवा अभ्यासिकेला भेट

कोरपना येथील मिशन सेवा अभ्यासिकेला राज्याचे माजी अर्थमंत्री व बल्लारपूर चे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सदिच्छा भेट दिली. अभ्यासिकेची पाहणी करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

युवा मोर्चाच्या रॅलीने वेधले लक्ष

महिला संमेलन पूर्वी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली चांगलीच लक्षवेधक राहिली.यात मोठ्या संख्येने युवक युवती नी सहभाग नोंदविला होता.