उद्या कोरपना येथे महिला मेळावा व मकरसंक्रांत उत्सव, आत्मनिर्भय महिला संमेलनकोरपना येथे दि २८ जानेवारी रोज गुरवारला ठीक १.३० वाजता श्रीकृष्ण सभागृह येथे महिला मेळावा, मकरसंक्रांत उत्सव व आत्मनिर्भय महिला संमेलन आयोजित करण्यात आले आहे
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार( माजी अर्थ नियोजन व वने मंत्री तथा लोकलेखा समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) तर अध्यक्ष म्हणून मा.हंसराजजी अहिर (माजी गृह राज्य मंत्री भारत सरकार) प्रमुख अतिथी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार संजयभाऊ धोटे,माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अल्काताई आत्राम, महापौर राखिताई कंचरलावार,भाजपा महिला आघाडी अध्यक्ष चंद्रपूर महानगर,अंजलीताई घोटेकर, भाजप प्रदेश सदस्य खुशाल बोडे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहूले, भाजपा यु. मो. जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा महिला आघाडी शहर कोरपना च्या वतीने करण्यात आले आहे.