▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

मी आणि माझा वाढदिवस



६ जानेवारी म्हणजे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आणि हा दिवस पत्रकार दिन म्हणून संपूर्ण राज्यात साजरा केला जातो आणि याच दिवशी श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन आणि त्याच दिवशी माझ्या लढवय्या माता-पित्यांनी मला जन्म दिला. माझी आई मुखराबाई व माझे वडील स्वर्गीय शंकरराव यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत माझे पालनपोषण केले व मला समाजामध्ये राहण्यायोग्य बनविले, हे मी माझे भाग्य समजतो. आयुष्यात मी कधीही माझा वाढदिवस "केक" कापून साजरा केला नाही. केला तर ते फक्त रक्तदान देऊन, रक्तदान शिबीराचे आयोजन करुन, सामाजिक कार्यक्रम घेऊनचं !


६ जानेवारी 2021 रोजी श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनी व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी, वयाच्या 40 वर्षी माझा जन्मदिन माझ्या घरी माझी पत्नी धनश्री, माझी पुतणी पुजा, भासी ममतायांनी वाढदिवसाचा मला माहीत न करता बेतच आखला होता. बारा वाजण्यापुर्वीच त्यांनी सर्व तयारी करून ठेवली होती. बारा वाजताचं त्यांनी केक कापण्याचा आग्रह धरला आणि औक्षवण करून केक कापायला लावले. लहानपणापासून कधी केक कापला नाही. त्यामुळे माझ्या डोळ्यात आंनदाश्रु आले. जन्मदिवस साजरा करणे म्हणजे आयुष्याचे एक वर्ष कमी होणे आहे. माझ्या आयुष्याचे एक वर्ष सहा जानेवारी या दिवशी कमी झाले, प्रथेनुसार "केक" कापण्यात आला, कुटुंबीयांसोबत प्रथेनुसार साजरा केलेला हा माझा प्रथम वाढदिवस ! आनंद हि तेवढा झालं परंतु परिश्रमाचे दिवस आठवलेत.


पत्रकार दिनानिमित्त असोशीएशन ऑफ स्माल अँड मिडीयम न्युजपेपर्स ऑफ इंडिया यांच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुध्दा माझा वाढदिवस "केक"माहिती कार्यालयाचे सहाय्यक माहिती अधिकारी जाधव साहेब, संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार डि. के. आरीकर, जिल्हाध्यक्ष जितेंद्र जोखड, दिनेश एकवनकर, राजु बिट्टूरवार, प्रभाकर आवारी, अरुण वासलवार, विनोद बोदोले, नरेश निकुरे, विठ्ठल आवळे, मनोज पोतराजे व इतर पत्रकारांच्या उपस्थितीत मला "केक" भरविण्यात आला. तर त्याच दिवशी सायंकाळी बहुभाषिक संपादक-पत्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपुुर यांच्या वतीने श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात पत्रकार दिनाच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जेष्ठ लढवय्ये पत्रकार "विलक्षण सत्य" चे संपादक किशोरकाका पोतनवार यांच्या हस्ते केक भरवण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे सहाय्यक माहिती अधिकारी जाधव साहेब, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे औषध तज्ञ विवेक माणिक, कुमार दर्पणचे संपादक कुमार जुनमलवार, रऊफ कच्छी हसमुध्दीन, रऊफ शेख, संदीप जंगम आदिंची उपस्थिती होती.


माझ्या राजकिय आयुष्यामध्ये समाजकारण व राजकारणात माझे मार्गदर्शक राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. महादेवराव जानकर साहेब यांची मोलाची भूमिका राहिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली "घडलेला मी" ! समाजकार्यात मला माझे मानले बाबा वासुदेवराव आस्कर यांची सुध्दा वयाच्या १६व्या वर्षांपासून मोलाची भुमिका राहीली !पत्रकारीतेत नंदकिशोर परसावार,देवनाथ गंडाटे व राजुभाऊ बिट्टूरवार यांच्यामुळे माझ्यात पत्रकारीता जन्माला आली! जन्मदिवस म्हणजे एक वेगळा क्षण असतो. माझ्या राजकारण, समाजकारणात आलेला ६ जानेवारी २०२१ रोजीचा माझा जन्मदिन हा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे कारण माझ्या पत्रकारिता क्षेत्रातील मित्रांनी तो त्यांच्या पद्धतीने साजरा केला व कुटुंबानेही पारंपरिकतेची "झालर" चढविली. माझे पुढील आयुष्य हे समाजकारण, राजकारण व निर्भीड पत्रकारीतांना जाईल, हेचं प्रण मी यादिवशी घेतले आहे. ज्या मित्रांनी आत्मीयतेने मंचावर माझा जन्मदिवस साजरा केला, त्यांचा मी ऋणी आहे. आयुष्यामध्ये माझ्या हातून समाज विधायक कार्य होतील असा यानिमित्ताने मी माझ्या परिचितांना, पत्रकार मित्रांना, समाज बांधवांना शब्द देतो.