जिल्ह्यातील सामाजिक वनीकरणातील "लाखों" चे भंगार परस्पर विक्री ?चंद्रपूर (प्रति.) जिल्ह्यातील वनविभागामध्ये अनेक गैरप्रकार होत असतात,,, रोपवाटिकीतेल रोपांची विक्री करतांनासुध्दा भ्रष्टाचार केला जात असल्याचे अनेक वेळा उघडकिस आले आहे. नुकतेच सामाजिक वनिकरण चे विभागीय वनाधिकारी शरद करे यांच्यावर रामनगर पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारिरीक शोषणासोबतचं भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणे वनविभागामध्ये घडत असतात. काही समोर येतात तर काहींवर पैशाच्या 'मुलामा' टाकून तर काही अन्य प्रकारे दडपले जातात. चंद्रपुर सामाजिक वनपरिक्षेत्र अधिकारी क्षेत्रातिल सामाजिक वनिकरण रोपवाटिके मधील भंगार चोरीला गेले असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. प्रकरण समोर आले आहे. मागील काही वर्षापासून याठिकाणी ठेवलेले भंगार कोणते ही शासकीय लिलाव न करता याच विभागातील कर्मचाऱ्यांनी परस्पर विकल्याचे प्रकरण पुढे येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाखो रूपये किंमत असलेले हे भंगार त्याच ठिकाणी कार्यरत असलेल्या वन कर्मचाऱ्याने वनविभागाची कोणतीही परवानगी नसतांना परस्पर विकले, त्यातुन मिळालेली मोठी रक्कम परस्पर गिळकृत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. या कर्मचाऱ्याचे फक्त हेच प्रकरण नसून ज्या-ज्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याने कर्तव्य(?) बजावले आहे, त्या ठिकाणी वनविभागाचे भंगार विक्री करण्याचा प्रताप केला आहे. या आधीही चोरी प्रकरणाची मुख्य वनसंरक्षकाकडे तक्रार ही करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. घरातचं ‘डाका' टाकणाऱ्या या चोरीची सखोल विभागीय चौकशी मुख्य वनसंरक्षक व वनमंत्र्यांनी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.