शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत करण्याची शिक्षक परिषदेची मागणी



भद्रावती प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक तालुका शाखा भद्रावती च्या शिष्टमंडळाने मा.मंगेश आरेवार गटविकास अधिकारी भद्रावती ,मा.प्रविण ठेंगणे सभापती पंचायत समिती भद्रावती,मा.धनपाल फटींग गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भद्रावती यांची भेट घेऊन परिषद दिनदर्शिका भेट दिली व खालील विषयावर निवेदनासह सविस्तर चर्चा संपन्न झाली.सेवा पुस्तक अद्यावत करण्यासाठी कॅम्प लावणे.प्राथमिक शिक्षकांना गोपनीय अहवाल देण्यात यावा.मासिक वेतनातून होणाऱ्या विविध कपाती तात्काळ जमा करण्यात याव्या.निवडश्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषद ला पाठविण्यात यावे.मासिक पगार बिल पीडीएफ केंद्राच्या व्हाट्सएप समूहावर टाकणेबाबत.प्राथमिक शिक्षकाचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करण्यात यावे.डीसीपीएस योजनेतून वगळलेल्या प्राथमिक शिक्षकाची रक्कम भविष्य निर्वाह निधी मधे वळती करणेबाबत प्रस्ताव जिल्हा परिषद ला पाठवीण्यात यावे.सर्व विषयावर सकारात्मक चर्चा झाली.
विलास बोबडे जिल्हा कोअर कमेटी सदस्य,विनोद बाळेकरमरकर तालुका अध्यक्ष,छत्रपती राऊत कार्यवाह,विलास खाडे कार्याध्यक्ष,शंकर निखाडे संघटनमंत्री,विलास मेश्राम उपाध्यक्ष ,मनोज चौखे उपाध्यक्ष ,संदीप गराटे सहकार्यवाह ,सचिन जांभुळे कार्यालयीन चिटणीस,सुभाष मसराम सर उपस्थित होते.