शाॅटसर्किटने लागलेल्या आगीत १०नवजात बालके होरपळलेआज सकाळी 5.30 च्या दरम्यान शॉटसर्किट ने भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात आग लागली ह्या आगीत अतीदक्षता विभाग मध्ये उपचार घेत असलेल्या सतरा नवजात बालकां पैकी दहा बालके जागीच ठार झाली.

दहा नवजात बालकां पैकी 3 बालके जळून तर सात बालके गुदमरून मृत्यू मुखी पडली. सात नवजात बालकांना वाचवण्यात सामान्य रुग्णालयाला यश आले.अधिक तपास भंडारा जिल्ह्या प्रशासन करीत आहे.

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 10 नवजात बालके दगावली, ह्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मात्र रुग्णालय विभागाकडून खळबळ उडविणारी माहिती समोर आली आहे.

शासकीय जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याची कबुली सुद्धा डॉक्टरांनी दिली आहे, या घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेत आरोग्यमंत्री टोपे यांच्याशी संपर्क साधत तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहे.
लाख रुपये देण्याची घोषणाही टोपे यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेदेखील भंडारा कडे रवाना झाले आहेत ्
दुःखद बाब म्हणजे ही बालके नुकतेच जन्माला आली होती मात्र ती रात्र त्यांच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरली, दुर्दैव म्हणजे बाळ दगावली ही माहिती सुद्धा रुग्णालय प्रशासनाने पालकांपासून लपवून ठेवली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी घटनेची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडून घेतली, या घटनेबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.