रक्तदान शिबिर घेऊन केला वाढदिवस साजराचंद्रपूर जिल्ह्यातील भटाळी (पायली) गावातील सचिन उपरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त व गावातील युवकांच्या मदतीने रक्तदान शिबिर घेऊन रक्तदान शिबिर घेण्यात आले.
सचिन उपरे यांना सामजिक कार्याची आवड असल्याने आपल्या वाढदिवसाला याच माध्यमातून गरज असलेल्या रुग्णांना रक्तसाठा उपलब्ध व्हावा या हेतूने त्यांनी गावातील युवकांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले..
या उपक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रक्त संदर्भातील व हजारो रुग्णांना रक्तदूत म्हणून काम करणारे...रक्तदान महादान निस्वार्थ फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष हकीम भाई हुसेन व सचिव प्रकाश नागरकर होते. कार्यक्रमाचे उदघाटक अभिनव किन्हेकर , प्रमुख पाहुणे म्हणून संगीताताई उपरे, मनीषा ताई थेरे , राजकुमार रायपुरे, बंडू सोनटक्के, अनिल डहाके, सतीश मालेकर, सुभाष गौरकार, राकेश गौरकार, खोब्रागडे साहेब, ए. एस. खोब्रागडे, निलेश डवरे होते
व या कार्यक्रमाला महत्वाचे योगदान देऊन घडवून आणणारे प्रवीण उपरे, सोनू आघासे , चेतन गौरकार, शरद देवतडे, बाळू उपरे, रोहित उपरे, विशाल उपरे, प्रमोद खिरटकर, गोलू खिरटकर, निखिल सातपुते, सुरेंद्र आमने, प्रवीण मुसळे, विशाल खामनकर, विक्की पेंदाम, सागर कातकर, लोकेश धांडे, विकास दोहे, गणेश बावीसकर , मंगेश दातारकर, अजित डाहूले, व ग्रामवासी उपस्थित होते..