राजुरा विधानसभा क्षेत्रात मनसेच्या एका नेत्याची "हकालपट्टी" होण्याचे संकेत !चंद्रपूर : राजुरा विधानसभा क्षेत्र हे उद्योगाने नटलेले आहे. त्यातचं गडचांदुर शहर सिमेंट कंपन्यामूळे "सिमेंट नगरी" म्हणून ओळखले जाते. औद्योगिक दृष्ट्या नावारूपास आलेल्या शहरामध्ये अनेक काळे धंदे सुरू आहेत. जमीन विक्री पासून कोंबड बाजारापर्यंत प्रत्येक व्यवसायात या शहराने आघाडी घेतली आहे. देश्यात नावलौकिक असलेल्या या गडचांदुरातील एका मनसेच्या पदाधिकाऱ्यांची खंडणी मागत असल्याच्या कारणावरून उचलबांगडी करण्यात येणार असल्याचे कळते. गडचांदूर हे नगरपंचायत असून या नगरपंचायतीत अनेक भोंगळ कारभार चालत असल्याचे दिसून येते. काही बिल्डरांना मनसेच्या या पदाधिकाऱ्यांने खंडणी मागत असल्याच्या कारणावरून पक्षाच्या वरिष्ठ स्तरांवर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी तक्रार केल्याचे कळते. मनसेला सध्या गडचांदुरांत सुगीचे दिवस आले आहेत. मनसेने या निवडणूकीत काही उमेदवार लढविले होते. सध्या नगर पंचायत मध्ये मनसे चे कोणीही उमेदवार निवडून आले नसले तरी बऱ्यापैकी मतदान उमेदवाराला पडले होते. यात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचे खुप मोठे योगदान राहिले आहे. अश्याच योगदान देणाऱ्या "त्या" नेत्याने खंडणी मागत असल्याच्या कारणावरून उचलबांगडी करण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत या पदाधिकाऱ्यांने स्वतःच्या पदरातील पैसे खर्च केले. त्यामुळे आर्थीक अडचण निर्माण झाल्यामुळे हा नेता आता खंडणीच्या मार्गावर उतरला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या पुढार्‍याची वरिष्ठ स्तरावर तक्रार केली असून त्याची लवकरच पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची चर्चा गडचांदूर शहरात सुरू आहे. "संसार बसण्यापूर्वीचं उजाडला" परिस्थिती मनसेच्या या नेत्यांची होणार या चर्चेला गडचांदुरात "पेव" फुटला आहे.