दुधमाळा येथे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले पुण्यतिथी "शिक्षक दिन" म्हणून साजरा करण्यात आला



दुधमाळा येथे माळी समाज संघटना दुधमाळा यांचे वतीने 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांची पुण्यतिथी "शिक्षक दिन" म्हणून साजरी केली गेली.कार्यक्रमाची सुरवात गावातून फेरी काढून झाली.यानंतर कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी ज्योतीबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला,त्यांच्या कार्याची विस्तृत माहिती दिली.त्यांना प्रतिमेत बंदिस्त न करता त्यांच्या विचारधारेला समाजात प्रवाहित करणे काळाची गरज आहे असं मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला मा.माधवजी उईके अध्यक्ष म्हणून उपस्थित होते,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री राकेश गुरनूले सर (मुख्याध्यापक पल्लवी विद्यालय दुधमाळा) बारशींगे सर,तर प्रमुख पाहुणे म्हणून वीनाताई कोकोडे (माझी उपसरपंचा ग्रा.पं.दुधमाळा),कान्हूजी कोराम,कपिलनाथ शेडमाके,यशवंतजी मोहूर्ले (अध्यक्ष नवकीर्ती बहुद्देशीय विकास संस्था दुधमाळा),वसंतजी गुरनुले (अध्यक्ष माळी समाज संघटना) नानाजी मोहूर्ले (सचिव माळी समाज संघटना दुधमाळा),सितकुरा कोकोडे (जेष्ठ नागरिक),तुळशीराम निकोडे,सारिकाताई वाढई,वैशाली कोकडे,माधुरीताई उईके (पो.पा.),ईश्वरजी मेश्राम,गजानन बावणे,शंभुजी सुरपाम आणि सर्व समाजबांधव पुरुष,महिला,तरुण आणि तरुणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार कोकोडे,प्रास्ताविक राकेश गुरनुले सर,तर आभार प्रदर्शन कामोद गावतुरे यांनी केले...