▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने २० आॅक्टोबर रोजी राज्यभर भव्य धरणे आंदोलनराज्यात अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकरीवर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे.विशेषतः विदर्भ ,कोकण, पश्र्चिम महाराष्ट्रात भातशेती,उस,सोयाबीन,कापूस,घरे,रस्ते,पूल,जनावरे आदींना मोठा फटका बसलेला आहे. मात्र राज्यातील महाआघाडी सरकारने नेहमीप्रमाणे पंचनामे करून कागदी घोडे नाचविण्याचे नाटक सुरु केले आहे.या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाने ठाम भूमिका घेतली आहे.या अस्मानी व सुलतानी संकटात शेतकर्‍याला प्रति हेक्टरी रु.50000 इतकी तातडीची मदत मिळावी यासह इतर मागण्यांसाठी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवरावजी जानकरसाहेब यांचे नेतृत्वाखाली मंगळवार दि. 20/10/2020 रोजी राज्यभर धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व रासपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने आपापले कार्यक्षेत्रात जिल्हाधिकारी कार्यालय,प्रांत कार्यालय,तहसिल कार्यालय आवारात किमान 10 शेतकर्‍यांसमवेत धरणे आंदोलन करावे. पक्षाचे वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात यावे. असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.एस.एल. अक्कीसागर, मुख्य महासचिव मा.बाळासाहेब दोडतले यांनी केले आहे.     यासंदर्भात दि.19रोजी संबंधित शासकीय कार्यालयात दि.20च्या धरणे आंदोलनाची माहीती देऊन पोहोच घ्यावी.                               व धरणे आंदोलन करताना कोरोनाचे संदर्भातील सर्व दक्षता बाळगावी असेही त्यांनी सांगितले आहे.