▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

भिम आर्मीच्या मदन बोरकर यांचे अन्नत्याग आंदोलनात भाजप शिवसेनेची उडी !



गडचांदूर :घनकचरा विरोधात बसलेल्या भीम आर्मी चे जिल्हाध्यक्ष मदन बोरकर यांच्या समर्थनार्थ आज गडचांदूर नगरपालिकेचे भाजप व शिवसेनेचे नगरसेवक एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे नगरसेवकांनी या लढ्यात उडी घेतली यामुळे सदर आंदोलनाला तिव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. राज्यामध्ये महाविकासआघाडी शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस यांची युती आहे. हीच कृती गडचांदुर नगर परिषदेमध्ये झाली होती. परंतु आता शिवसेनेने या आंदोलनात उडी घेतल्यामुळे पुढे काय होते हे बघणे महत्त्वाचे ठरेल. राज्याचे नगर विकास मंत्री म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे कारभार बघत आहेत. गडचांदुर नगर परिषद मध्ये आलेल्या या नाट्यामुळे आता हे आणखीन चिघळेल की थंडबस्त्यात जाईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
मागील चार दिवसांपासून गडचंदुर नगर परिषद च्या आवारात भीम आर्मी चे जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर हे गडचांदूर येथील घनकचऱ्याच्या भ्रष्टाचाराविरोधात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. गडचांदुर नगर प्रशासनाचे धिंडवडे काढणारा हा प्रकार असून युवक कल्याण सुशिक्षित बेरोजगार संस्थेला घनकचरा संबंधात गडचांदूर नगर परिषद कडून कंत्राट देण्यात आले होते. मागील दीड वर्षापासून या कंत्राटात अनियमितता असून नियम, अटी व शर्ती चे पालन न करता कंत्राटदाराने गडचांदुर शहरात अस्वच्छतेचा बाजार मांडला आहे. शहरातील सुज्ञ नागरिक, सामाजिक संघटना, विरोधी पक्ष यांनी या विरोधात वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. घनकचरा कंत्राटदाराला विरोधात निष्पक्ष चौकशी करून त्यांना दंड आकारण्यात यावा व त्यांची कंत्राट रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, यासंदर्भात वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून निवेदने देण्यात आली आहे परंतु गडचांदुर नगर परिषद प्रशासन आर्थिक देवाण-घेवाणीतून घनकचरा कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याच्या आरोप होत आहे. नको प्रशासनाच्या दुर्लक्षित इथे मुळे व घनकचरा कंत्राटदाराच्या अनिमित त्यामुळे आरोग्याच्या समस्या गडचांदूर मध्ये मोठ्या प्रमाणात उभ्या राहिले आहे. आतापावेतो मिळालेल्या माहितीनुसार डेंगू आजाराने तीन लोकांना मृत्यूने कवटाळले आहे. गडचांदूर न.प. च्या मुख्याधिकारी या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून न.प. कर्मचारी कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत असल्याचे कारण पुढे करून घनकचरा कंत्राटदारांला पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. मुख्य म्हणजे गडचांदूर आत्तापर्यंत बाधितांची संख्या बघितली तर ती धोकादायक आहे. स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक न.प. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी न.प. ला प्राप्त झाल्यानंतरही न.प. प्रशासन व स्वतः मुख्याधिकारी यांनी याकडे कानाडोळा केला आहे. आज गडचांदुर शहरवासी अस्वच्छतेच्या वातावरणात कोरोनाच्या भयावह स्थितीमध्ये जगत आहेत, वारंवार तक्रारी करूनही न.प. कर्मचारी व मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून नागरिकांच्या आरोग्याकडे न.प. प्रशासनाचे "आर्थिक" देवाणघेवाणीतून दुर्लक्ष होत असल्याचे बोलल्या जात आहे. त्याचाच उद्रेक "अन्नत्याग" आंदोलनाच्या स्वरूपात उमगला असल्याचे चित्र आहे.

भिम आर्मीच्या आयु. मदन बोरकरांचे अन्नत्याग आंदोलन !
भीम आर्मी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आयु. मदन बोरकर यांनी मागील चार दिवसांपासून गडचांदूर न.प. च्या आवारात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मदन बोरकरांनी यापूर्वी घनकचरा कंत्राटदारावर व व त्यामध्ये सामील असलेल्या न.प. कर्मचारी-अधिकारी व पदाधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी वारंवार प्रशासन व जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. त्यांच्या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखविण्यात आली, त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी आंदोलनाच्या पावित्रा उचलला असून घनकचरा कंत्राटी संबंधात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या त्यांच्या रास्त मागणीकडे जिल्हा प्रशासन त्वरित लक्ष न घातल्यास गडचंदुर नगर परिषद च्या भ्रष्ट कारभाराची चौकशी न केल्यास याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील हे मात्र तेवढेच सत्य आहे.

मुख्याधिकाऱ्यांचा अफलातून व्यवहार !
गडचांदूर च्या नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्या उद्धट व्यवहार हा आता नवीन विषय राहिलेला नाही. त्यांच्या व्यवहाराचे अनेक ऑडिओ व्हायरल झाले आहेत. भीम आर्मी संघटनेचे मदन बोरकर यांच्याशीही त्यांनी केलेल्या अभद्र व्यवहाराची ऑडिओ क्लिप पुराव्यासह सादर करून मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी तक्रार करण्यात आली आहे. अशा एक ना अनेक तक्रारी मुख्याधिकारी विरोधात जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. परंतु आज पावेतो त्या तक्रारींवर कोणतीच कारवाई जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली नाही. जिल्हा प्रशासनाने गडचांदूर न.प. प्रशासनाच्या विरोधात आलेल्या संपूर्ण तक्रारीची चौकशी करून उद्धट मुख्याधिकारी यांच्याविरोधात ठोस पावले उचलायला हवीत. घनकचरा कंत्राट याविरोधात जर तक्रारी असतील तर स्वत:ला कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक समजणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी घनकचरा संबंधातील संपूर्ण कागदपत्रे न मागता नागरिकांना व सामाजिक कार्यकर्त्यांना उपलब्ध करून द्यायला हवीत. माहिती अधिकारात माहिती मागणाऱ्याना शुद्धलेखन सुधारा अशा सांगणाऱ्या अती शहाण्या मुख्याधिकारी यांनी स्वतःच्या व्यवहार जरी सुधरवीला तरी अशी स्थिती उद्भवणार नाही. त्या एक अधिकारी आहेत त्यांच्याकडून नागरिकांना अपेक्षा आहे, याची जाण त्यांनी ठेवावी.

स्थानिक आमदारांनी फिरविली पाठ!

राजुरा चे आमदार सुभाष धोटे हे काल गडचांदूर येथे कॉंग्रेसच्या एका कार्यक्रमासाठी आले होते. परंतु त्यांनी नगरपरिषद च्या भ्रष्टाचाराविरोधात बसलेल्या या आंदोलनाकडे पाठ फिरविली याबाबत गडचांदूर मध्ये तर्कवितर्कांना जोर आला आहे.