सी.एस.टी. पी.एस.मधील रोप वे -(LT) साईड टूल डाऊन



महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना(चंद्रपूर) जिल्हा अध्यक्ष व माजी नगरसेवक मा.बंडूभाऊ हजारे व संघटनेचे अध्यक्ष प्रफुल सागोरे सचिव प्रमोद कोलारकर ,संघटक अमोल भट यांच्या उपस्थितीत CSTPS मधील CHP_A 210 रोप वे_(LT) साईड पूर्ण पणे टूल डाऊन करण्यात आली.
CSTPS मधील रोप वे- (LT) साईड चा कंत्राट हा प्रीमियर प्लांट सर्व्हिस या कंपनीकडे अनेक वर्षा पासून देण्यात आले आहे. मात्र कंत्राटदार हे मागील अनेक वर्षा पासून येथील कार्यरत असणाऱ्या कामगारांचे शोषण करीत आहे.कामगारांना मासिक वेतन महिन्याच्या अंतीमतरिखेस न देणे, शासनाने व प्रशासनाने लागू केलेला  २०% पूरक भत्ता, अनेक वर्षाचे थकबाकी असणारे( EL) कामगारांना नियमित वेतन देत नसल्याने देत नसल्याने तसेच  CSTPS येथील प्रशासन / व्यवस्थापन अश्या मगृर कंत्राटदाराला जाब विचारात  घेत नसल्याने साईड टूल डाऊन करण्यात आली.
                 संघटनेच्या वतीने साईड पूर्णतः बंद करण्यात आल्यानंतर  प्रीमियर प्लांट सर्विस चे साईड इन्चार्ज यांनी ताबडतोब भेट देऊन  कामगारांचे मासिक वेतन, थकीत वेतन,पुरक भत्ता देण्याचे आश्वासन दिल्यानंतर टूल डाऊन आंदोलन बंद करून कामगारांना त्यांच्या  कामाच्या ठिकाणी परत पाठविण्यात आले.या आंदोलनात सर्व कामगार उपस्थित होते.