▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

जनतेने संचारबंदीत स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हा



चंद्रपूर, दि. 9 सप्टेंबर : चंद्रपूर शहर तसेच लगत असणारे दुर्गापूर, पडोली, उर्जानगर व बल्लारपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा प्रसार आणखी वाढु नये, संसर्गाची साखळी खंडित व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी तसेच व्यापारी असोसिएशनच्या संमतीने 10 सप्टेंबर गुरुवार ते 13 सप्टेंबर रविवार पर्यंत जनता संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नागरिकांनी या जनता संचारबंदीचे पालन करून स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

या बाबी सुरू राहतील : सर्व रुग्णालय, औषधालय, कृषी केंद्र, शासकीय कार्यालय, तसेच एमआयडिसी मधील सर्व आस्थापना सुरु राहतील. दूध वितरण, पार्सल सुविधा, सर्व पेट्रोल पंप, वर्तमानपत्रांचे वितरण सुरू राहतील.
या बाबी बंद राहतील : सर्व किराणा, भाजी-फळे दुकाने, बाजारपेठेतील इतर दुकाने पूर्णता बंद राहतील. बँका फक्त अंतर्गत कामकाजासाठी सुरू असतील परंतु ग्राहक सेवेसाठी बंद राहतील. त्याचबरोबर, चंद्रपूर शहर, दुर्गापूर, पडोली, उर्जानगर व बल्लारपूर शहरातील सर्व पानठेले, चहा टपऱ्या, हातगाड्या, फुटपाथवरील सर्व दुकाने बंद राहतील.