खासदार अशोक नेते यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी



गडचिरोली / अहेरी :- ( गांधी बोरकर )
अहेरी तालुक्यातील देवलमरी परिसरात पुरामुळे सोयाबीन व कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले खासदार अशोक नेते यांनी अहेरी तालुक्याचा दौरा करून देवलमरी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी भाजपचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओलालवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संदीप कोरेत, तालुका महामंत्री पोशालू चुधरी, अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
  यावेळी खासदार अशोक नेते यांनी देवलमरी परिसरातील अबनपल्ली, इंदाराम, सॅन्ड्रा, देवलमरी इत्यादी गावातील शेतीची पाहणी केली असता सोयाबीन व कपाशी पीक पूर्णतः नष्ट झाल्याचे दिसून आले. प्राणहिता नदीच्या पुराचे पाणी   शेतात भरून राहिल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेऊन तातडीने सर्व्हेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  मदत तात्काळ मिळण्यासाठी अहवाल सादर करण्याच्या सूचना खासदार अशोक नेते यानी तहसीलदाराना दिल्या. तसेच