ब्रम्हपुरी : गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील हजारो हेक्टर धान शेती सह अनेक गावे पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आम आदमी पार्टीच्या राज्य सदस्य पारोमिता गोस्वामी यानी ब्रम्हपुरी व सावली भागातील पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
शासनाच्या बेजबाबदार पणामुळे वैनगंगेला आलेला पुराचा फटका नागरिकांना बसलेला आहे यात येथील शेतकरी पुर्णतः उध्वस्त झालेला आहे पूरग्रस्तांना पुढचे जीवन जगताना अनेक संकटाशी सामना करावा लागणार आहे शासनाने नुकसानीची त्वरित मोठी मदत करण्याची मागणी यावेळी गोस्वामी यांनी केली ब्रम्हपुरीतील 21 गावांना पुराचा फटका बसला आहे पारोमिता गोस्वामी यांनी तालुक्यातील किन्ही,खरकाडा,निलज , सावली तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतीची, पडलेल्या घरांची पाहणी केली व आपदग्रस्त नागरिकांसोबत, शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधला खरकाडा,किन्ही येथील नागरिकांनी गावाचे पुनर्वसन करण्याकरिता ताईंनी पाठपुरावा करण्याची मागणी केली.
पुरामुळे गावागावात गाळ साचला असल्याने दुर्गंधीयुक्त वातावरण तयार झाले आहे पिण्याचे पाणी अयोग्य झाले आहे तातडीने ब्लिचिंग पावडर टाकण्यात यावे व आपादग्रस्त गावात तातडीने आरोग्य शिबिर घेऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात यावी पुरात पडल्या घरांना घरकुल देण्यात यावे पुरामुळे प्रचंड शेतीचे नुकसान झाले अनेक शेतामध्ये रेती व गाळ साचलेला आहे असून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात यावी व पिक विमा मंजूर करण्यात यावा पूरग्रस्त भागातील छोटे-मोठे उद्योगधंदे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे गुरंढोरं गेले आहेत शेतकऱ्यांचे अनेक मोटार संच साहित्य यात वाहून गेले आहे घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक साहित्य वाहून गेले तर घरे पडल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत उघड्यावर जीवन जगावे लागत आहे पुरात मत्स्यपालन, कुक्कुटपालन यांचे सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात झाले पूरग्रस्तांना जीवन जगण्यासाठी अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे पूरग्रस्तांचा पुढचा प्रवास बिकट असल्याने शासनाने लक्ष देऊन मोठ्या प्रमाणात मदत देण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या राज्य सदस्य पारोमिता गोस्वामी यांनी केलेली आहे.