बीन पावसाच्या पुराने सावली तालुक्यात हाहाकारसावली तालुक्यात बीन पावसाच्या पुरामुळे, करोडो रूपयाचे नुकसान झाले असून, लोकांच्या घरात पाणी शिरून, संसार अस्ताव्यस्त झाले असतांनाही, तालुका प्रशासनाने नागरीकांना मदत करीत नसल्यांने संताप व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीच्या नेत्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी पुरग्रस्त भागाचा दौरा करून, जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.

आपत्ती येणार हे माहित असतांनाही, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने किंवा जिल्हा प्रशासनाने कोणतेही पूर्वतयारी केली नाही, बाधीत होणाÚयांची काळजी घेतली नाही याचा मोठा फटका जिल्हयाला बसला असल्यांचा आरोप अॅड. गोस्वामी यांनी आमचे प्रतिनिधीषी बोलतांना केला.
उसेगांवपासून जवळच असलेल्या भट्टीजांब या गावाला चारही बाजूने पाण्यानी वेढले आहे. या गावकर्यांपर्यंत प्रशासन अजूनपर्यंत पोहचले नसून, येथील नागरीकांना वाघाच्या किर्र जंगलातूनच सुरक्षीत स्थळी यावे लागणार आहे. हेलिकॅप्टर किंवा अन्य साधनांचा वापर करूनच, या गावातील नागरीकांना दिलासा देता येणार आहे.

तालुक्यातील उसेगांव, सिर्सीसह अनेक गावातील घरात मागील तीन दिवसापासून पाणी शिरले आहे. यामुळे अनेकांना आपल्या घरातील सामान रस्त्यावर आणून ठेवावे लागत आहे. उसेगांवात अनेकांचा संसार रस्त्यावरच मांडला आहे. घरात पाणी शिरल्यांने, घरी अन्न शिजविता आले नाही, परिणामी अनेकांना लहान मुलांसह उपासमार सहन करावे लागत आहे.
तालुक्यातील साखरी, लोंढोली, जीबगांव, आकापूर, करोली, बोरमाळा, वाघोली बुटी, भान्सी, पेटगांव, सामदा या गावाचे मार्ग बंद झाले असून, या गावासह, कवठी, रूद्रापूर, पारडी येथील शेतकर्यांच्या शेती पाण्याखाली गेल्यांने, शेतकरी हवालदिल झाला आहे.
पुराचे आलेले अचानक संकट हे, नैसर्गीक नसून, मानवनिर्मीत आहे. यामुळे, प्रशासनाने दोन दिवस आधी गावकर्यांना पूर्वसुचना दिली असती तर, नागरीकांना पूर्व तयारी करता आली असती असे मत या पुरावमुळे प्रभावित झालेले षेतकरी व्यक्त करीत आहे. पावसाचे कोणतेही वातावरण नसतांना अचानक आलेल्या या पुरामुळे, अनेक शेतकऱ्यांचे जनावरे, शेतीची औजारे, मोटरपंप, आॅईल इंजिन शेतातच राहीले आणि पावसामुळे ते आता निकामी झाल्यांने, शेतकरी संतप्त झाले आहे.
आम आदमी पार्टीच्या नेत्या, अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी आज, उसेगांव, सिर्सी, कवठी, पारडी, रूद्रापूर भागात जावून शेतकर्यांशी, पुरपिडीतांशी संवाद साधला. सरकारने हा पुर जनतेच्या माथी लादलेला पुर असून, यामुळे आधीच कोरोणाने त्रस्त जनतेला, सुलतानी पुराचे संकट लादून नागरीकांचे जगणे अशक्य करीत असल्यांचा आरोप केला. गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडतांना, नागपूर जिल्हयातील पारशिवणी भागातील नागरीकांना दोन दिवसापूर्वीच सुचना देवून, प्रशासनाने तेथील नागरीकांना सुरक्षीत स्थळी हलविले आणि नंतर, पाणी सोडले. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मात्र वैनगंगेच्या काठावरील गावकऱ्यांना मात्र पारशिवणी सारखे पुर्वसुचना व मदत न करताच, पाणी सोडल्यांने, शेतकरी, व सामान्यांची करोडो रूपयाची नुकसान झाली आहे. लोकांच्या घरात पाणी शिरून, लोक उपासमार सहन करीत असतांनाही प्रषासनाकडून अजूनपर्यंत कोणतीही मदत केली नाही असाही अॅड. गोस्वामी यांनी आरोप केला आहे.  आपत्ती येणार हे माहित असतांनाही, आपत्ती व्यवस्थापनाकडे प्रशासनाने कोणतेही लक्ष दिले नाही, याचा मोठा फटका जिल्हयाला बसला असल्यांचा आरोप त्यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलतांना केला.