गडचांदुर येथील प्रविण बुच्चे यांचे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडचंद्रपूर ,शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे दरवर्षी आदर्श शिक्षकाची निवड करून पुरस्कार देण्याची परंपरा आहे.पुरस्कारासाठी शिक्षण विभागाने १७ शिक्षकांची निवड करण्यात आलीआहे.यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ३७ शिक्षकांनी अर्ज सादर केले होते.त्यापैकी ३६शिक्षकांनी मुलाखती व पीपीटीव्दारे स्वतः राबविलेल्या विविध उपक्रमांची निवड समितीसमोर सादरीकरण केले होते.मुलाखती मध्यून १७शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पल्लेझरी ता.जिवती येथिल प्रविण कवडुजी बुच्चे यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.आपल्या शाळेची पत सांभाळत त्यांनी सामाजिक क्षेत्रातही नावलौकिक मिळविला आहे.सामाजीक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतात त्यांच्या निवडीने सामाजिक क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.