गडचांदूरात डेंगू मलेरिया अस्वच्छतेचा दुसरा बळी, न.प. प्रशासन "आर्थिक(?)" झोपेत !



गडचांदूर : गडचांदुर नगर परिषद घनकचरा कंत्राटदारासोबत न.प.च्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे आर्थिक साटेलोटे असल्याचा स्पष्ट आरोप आज गडचांदूरमध्ये होत असून गडचांदूर न.प. च्या वादग्रस्त मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांची भूमिका याठिकाणी संशयास्पद आहे. स्थानिक भ्रष्ट कर्मचारी त्यांची दिशाभूल करीत असल्याचे बोलल्या जात आहे. न. प. कर्मचाऱ्यांवर गडचांदुर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांचा वचक नाही, आर्थिक देवाण-घेवाण झालेली आहे, असा स्पष्ट आरोप आज गडचांदूर मध्ये होत आहे. गडचांदूर मध्ये नुकताच दोन जनाचा डेंगूने मृत्यू झाला, आज गडचांदूर शहरांमध्ये मलेरिया, डेंगू नी थैमान मांडले आहे. घनकचरा सोबत गडचांदूर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी एका कंत्राटदाराला देण्यात आली आहे. या कंत्राटदाराचे काम हे असंतुष्ट जनक असून त्या संबंधात अनेक तक्रारी गडचांदुर नगर परिषद, चंद्रपूर चे जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेले आहे. परंतु गडचांदुर नगर परिषदेतील भ्रष्ट कर्मचारी व स्वतः मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांचे जाणीवपूर्वक या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलल्या जात आहे. नुकतेच गडचांदूर काँग्रेस कमिटीने यासंबंधात तक्रार दिली असून गडचांदूर च्या स्वच्छतेची संपूर्ण काळजी घेतल्या न गेल्यास गडचांदूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे मोठे आंदोलन गडचांदूर शहरांमध्ये करणार असल्याचे हे निवेदन आहे. गडचांदूर शहरामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. नगराध्यक्ष काँग्रेसच्या आहे तरी सुद्धा काँग्रेसला आंदोलन करण्याची भूमिका घ्यावी लागते याचाचं अर्थ न.प. प्रशासन निगरगट्ट झाला असून मुख्याधिकाऱ्यांचा न.प. प्रशासनावर वचक नाही असे स्पष्ट होते. गडचांदूर शहरातील घनकचऱ्याचा कंत्राट असलेल्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गडचांदूर काँग्रेसने करायला हवी, आंदोलनाची भूमिका सत्ता असताना ही घेणे ही नामर्दुनगीचे ची लक्षण आहेत, अशी चर्चा आज गडचांदुर मध्ये होत आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे दोन निष्पापांचा डेंगू मुळे मृत्यू झाला. आज मलेरिया, डेंगू यांनी गडचांदूर शहरामध्ये थैमान मांडले आहे मग न.प. प्रशासन दोन मृत्युनंतर काय सुविधा उपलब्ध करून देईल, याबाबत चर्चा होत आहे.

घनकचरा कंत्राटदारास सोबत भ्रष्ट कर्मचारी?
जबाबदार अधिकाऱ्यांची बेजबाबदार उत्तरे, मग मुख्याधिकारी गप्प कां?
गडचांदुर नगर परिषद ने 2019 ला एका खाजगी कंत्राटदाराला स्वच्छतेसंबंधात कंत्राट दिले होते. या कंत्राटदाराने त्यांचे कार्य यो इतरग्यरीत्या पार पाडले नाही, अशा अनेक तक्रारी गडचांदुर नगर परिषद ला प्राप्त झालेल्या आहेत, परंतु कंत्राटदारावर नियमांचे भंग केले म्हणून गडचांदुर नगर परिषद ने अद्यापपावेतो कोणतेही दंडात्मक किंवा कायदेशीर पाऊल उचलले नाही. या संबंधात उत्तरे देतांना गडचांदुर नगर परिषदेचे स्वच्छता अधिकारी प्रमोद वाघमारे हे निर्लज्जपणे उत्तर देतात. कोरोना च्या कार्यात आमचा संपूर्ण कर्मचारी व अधिकारी वर्ग लागला आहे, असे बेजबाबदार उत्तरे मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांचेकडून जबाबदार नागरिकांना दिले जातात, यासंबंधातील ऑडिओ-व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारीही झाल्या आहेत, तरीसुद्धा गडचांदूर प्रशासनाच्या कारभारात कोणतीचं सुधारणा झालेली नाही हि एक लाजिरवाणी बाब आहे. नुकतेच या संदर्भात काही वृत्त न्यूज पोर्टल वर वृत्त प्रकाशित झाले होते. कंत्राटी संबंधातल्या नियम-अटी बद्दल माहिती विचारण्यासाठी एका संपादकाने प्रमोद वाघमारे यांना फोन केला असता त्यांनी पिदुरकर नावाचे ज्युनिअर इंजिनिअर यांच्याशी संपर्क करायला सांगितले. पिदुरकर यांनी हा कंत्रात तीन वर्षासाठी करण्यात आला असून घंटागाड्यांच्या कंत्राट नव्हता, अशी दिशाभूल करणारी माहिती एका वृत्तपत्राच्या संपादकाला दिली. महत्त्वाचे म्हणजे माहिती देणारे अधिकारी हे अधिकृत हवे, ज्यांच्याकडे टेबल आहे त्यांनी त्या संबंधातील माहिती वृत्तपत्राच्या संपादकाला आणि पत्रकारांना द्यायला हवी परंतु गडचांदुर नगर परिषद मध्ये सगळेच नियम धाब्यावर बसवून चुकीच्या माहित्या प्रसारित केल्या जातात. मुख्याधिकारी स्वतः कोणताही फोन उचलत नाही किंवा समाधानकारक उत्तरे देत नाही ही तक्रार फक्त पत्रकारांची-संपादकाचीचं नाही तर स्थानिक लोकप्रतिनिधी, जनतेचे सेवक यांच्या सुद्धा आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे राज्याचे नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. स्थानिक राष्ट्रवादीचे गडचांदूरचे नगरसेवक व पदाधिकारी यांनी गडचांदूर न.प. चे मुख्याधिकारी स्वतः त्यांच्या फोन उचलत नाही अशी खळबळजनक माहिती नांव न सांगण्याच्या अटीवर संपादकाला दिली. मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःची जबाबदारी ओळखावी व भ्रष्ट कर्मचाऱ्यांना-अधिकाऱ्यांना बाजूला ठेवावे असे आता बोलले जाऊ लागले आहे. कोरोना संक्रमन रोखण्यासाठी फक्त शासकीय अधिकारी व कर्मचारी लागले नाही तर पत्रकारांची भूमिकाही याठिकाणी महत्त्वाची आहे. स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी ही गोष्ट स्पष्ट केली होती. जनतेमधून निवडून येणारे जनतेचे सेवक, स्थानिक प्रतिनिधी, पत्रकार यांनाही सन्मानाची वागणूक मिळायला हवी, हा त्यांचा अधिकार आहे. सामान्य जनता सुद्धा कोरोना संक्रमणात संदर्भात आज भयावह स्थितीमध्ये जगत आहे. या बाबी शासकीय अधिकाऱ्यांनी बिलकुल विसरून नये. भारतामध्ये अद्यापही लोकशाही आहे, याचे भान शासकीय कर्मचाऱ्यांनी अवश्य ठेवावे. अन्यथा याचे परिणाम भविष्यामध्ये भोगावे लागतील, याची जाण गडचांदूर न.प. च्या मुख्याधिकारी यांनी अवश्य ठेवावी. न.प.च्या संबंधात येणाऱ्या तक्रारी त्यांनी गांभीर्याने घ्याव्या, त्यावर त्वरित तोडगा काढावा, भारतात लोकशाही आहे याचा विसर कोणत्याही अधिकाऱ्यांनी पडू देऊ नये. एवढेच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ या नात्याने त्यांना सांगावेसे वाटते.
गडचांदूरात डेंगु- मलेरियाचे थैमान !
दोन मृत पावले त्यास जबाबदार कोण?
गडचांदूरात डेंगू मलेरियाने थैमान घातले आहे. गडचांदूर येथील पॅथालॉजी लॅबोरेटरीमध्ये रक्त तपासणीसाठी गेलेल्या रूग्णात चार- पांच जण डेंगू मलेरियाचे दररोजच रूग्ण निघत आहे आणि तपासणी न केलेले बरेच रूग्ण असण्याची जास्तच संभवना आहे. ग्रामीण रूग्णालय, गडचांदूर येथे योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना चंद्रपूर येथे पाठविल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यातल्या त्यात ग्रामीण रूग्णालयात रक्त तपासणी रिपोर्ट लवकर येत नसल्याने आजार वाढत असतो. कोविड-१९ च्या नावाखाली नगर परिषद गडचांदूर जास्तीत जास्त कोरोना रूग्णाकडे असल्याने नगरात साफ सफाईच्या अक्षम्य दुर्लक्ष होते आहे. तसेच साफसफाईचे कामे कंत्राटी पद्धतीने असल्याने यांत कामचुकारपणा व अरेरावीच जास्त प्रमाणात आहे.
नगर परिषदेच्या ढिसाळ व्यवस्थापेमूळे १७ वर्षिय शाळकरी मुलगी आयु. सुरेखा पुत्री कु. सुरक्षा सुरेश उमरे हिचा शासकीय मेडिकल कॉलेज तथा सामान्य रूग्णालय, चंद्रपूर येथील अती दक्षता विभागात शनिवार दिनांक ५ सप्टेंबर २०२० ला मृत्यू झाला.तर गुरूवारला दि.१०सप्टेबर रोजी पुन्हा एकाचा बळी गेलेला आहे त्या मृत्यूस जबाबदार कोण? हे दोन्ही अकाली मृत्यू गडचांदूरवासीय सर्व सामान्य जनतेच्या मनाला चटका लावून जात आहे. नगर परिषदेच्या नाकर्तेपणाबद्दल सामान्य जनतेत चिड आणि असंतोष आहे.

खरे म्हणजे कर्तव्यात कसूर करणा-या व बिमारी फैलावण्यास जबाबदार अधिकारी- कर्मचा-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. तसेच यांत सेवाभावी संस्थेने पुढाकार घेऊन युद्ध पातळीवर साफसफाई बरोबरच डेंगू मलेरियाची चाचण्या ( टेस्ट) करण्यात यावी. नाकर्तेपणाबद्दल यांचा जाब विचारण्यासाठी व निषेध नोंदविण्यासाठी लवकरच धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

गडचांदूर शहर काँग्रेसतर्फे न.प. प्रशासनाच्या विरोधात आंदोलन !
बुधवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचांदुर नगर परिषद ला स्वच्छतेबाबत निवेदन देण्यात आले. त्यावेळी मुख्याधिकारी ह्या न. प. मध्ये अनुपस्थित असल्यामुळे त्यांचे सोबत या विषयावर चर्चा करण्यात आली. दोन फाकिंग मशीन लावण्यात यावी अशी मागणी नगर परिषदेला करण्यात आली व भ्रमणध्वनीवरून न.प. च्या मुख्याधिकारी शेळकी यांनी ही मागणी त्वरित पूर्ण करण्यात येईल असे सांगितले. यासंबंधाने गडचांदूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष संतोष महाडोळे यांनी गडचांदूर च्या स्वच्छतेबाबत लवकरच काँग्रेस कमिटी आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

आश्चर्य : सत्तेत असतानाही काँग्रेसचे आंदोलन !
कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कां नाही ?
आज राज्यामध्ये काँग्रेस सोबत शिवसेना, रा.कां.ची सत्ता आहे. गडचांदूर नगरपरिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सत्तेत आहे. सत्ताधारी पक्षांनाही स्वच्छतेबद्दल आंदोलन करावे लागते ही फार आश्चर्यकारक बाब आहे. सत्ताधाऱ्यांनी हक्काने जनतेसाठी प्रत्येक गोष्ट मागून घ्यायची असते परंतु या ठिकाणी तसे काहीही होत नाही असे दिसत आहे. घनकचऱ्याचे कंत्राट यावर अनेक तक्रारी झाल्या आहेत. परंतु त्या तक्रारीवर काहीच झाले नाही. गडचांदूर न.प. प्रशासन हे निगरगट्ट झाले आहे. असेच सत्ताधारी-विरोधी पक्ष सांगत असतात. मग अस्वच्छतेमुळे गडचांदूर शहरात दोन निष्पाप लोकांचा बळी गेला. आजच्या स्थितीमध्ये मलेरिया, डेंगू चे रुग्ण गडचांदूर शहरांमध्ये मिळत आहेत. मग सत्ताधारी पक्षाने घनकचरा कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ची मागणी घेऊनच गडचांदुर नगर