गृहमंत्री मा.अनिल देशमुख व महाराष्ट्र पोलीसांवरील अभद्र अपमानजनक टिपणी चा निषेध :- नितीन भटारकर




चंद्रपूर::- न्यूज चॅनल रिपब्लिक भारत चे अर्णव गोस्वामीनी सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणी "राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे, गृहमंत्री मा. अनिलजी देशमुख व महाराष्ट्र पोलिसांच्या" विरोधात अभद्र व अपमानास्पद टिप्पणी केल्याने राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात कार्यकर्त्यांनी अर्णव गोस्वामी चा निषेधार्थ घोषणाबाजी करीत पुतळा जाळला.
विरोध प्रदर्शनादरम्यान जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी सांगितले की देशावर आलेल्या कोरोना सारख्या संकट व महाआपत्तीवर अगोदर एकत्रितपणे लढण्याची गरज असून यात सत्तराव्या वर्षांत असणारे राज्याचे गृहमंत्री ह्यांनी स्वतः ला झोकून संपूर्ण राज्य पिंजून काढले तसेच महाराष्ट्र पोलिसांनी देखील या लढ्यात अतुलनीय कामगिरी केली, कोरोनाच्या या लढ्यात अनेक पोलिस बांधव शहिद झाले या मुळे यांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. सुशांत ला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची देखील भावना आहे, परंतु गरज नसताना स्वतः ला मोठं करण्याचा नादात या "महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री, मा. गृहमंत्री व महाराष्ट्र पोलिस बांधवावर" अभद्रपणे टिपणी करणे निषेधार्य आहे. ज्या पोलिसांची स्कॉटलँड-यार्ड पोलिसांशी तुलना केल्या जाते त्या महाराष्ट्र पोलिसांवर आम्हा सर्वांना अभिमान आहे. मराठी व महाराष्ट्राचा अपमान करणारे व खिल्ली करणारे वक्तव्य कदापि सहन केले जाणार नाही. व म्हणून अर्णव गोस्वामी च्या पुतळ्याचे दहन आज केले.
सदर आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले असुन सदर आंदोलनात रा.वि.का. जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, रा.यु.का. शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, मिडिया सेल जिल्हाध्यक्ष नितीन पिंपळशेंडे, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, जिल्हा सचिव अभिनव देशपांडे, उपाध्यक्ष संजय ठाकूर, किसन अरडळे, कुणाल ठेंगरे, प्रफुल्ल कुचनकर, राहुल भगत उपस्थित होते.