चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध महाकाली मंदिर परिसरात नागेश उर्फ नाग्या हा दारूचा व्यवसाय करतो. त्याला पोलीस वाल्या "जगताप" ची पूर्ण साथ आहे, असे तो खुलेआम सांगतो. जिल्ह्यात सुरू असलेला दारूचा व्यवसाय आणि काही भ्रष्ट पोलिसांची मिलीभगत हा विषय आता नविन राहिला नाही. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांशी दारु विक्रेत्यांची आर्थिक देवाण-घेवाण बाबतीत विक्रेते आता सार्वजनिकरित्या चर्चा करून राहिले आहे.
नागेश उर्फ नाग्या नावाचा दारू विक्रेता महाकाली मंदिर परिसरात आपला दारूचा व्यवसाय करतो. आपले "जगताप" साहेबांशी घनिष्ठ संबंध असून आपले कोणी ही काहीही बिघडवू शकत नाही, अशी दमदाटी ही तो करित असतो. त्यांना पोहोचणारी बिदागी किती हे सुद्धा तो अभिमानाने सांगतो. "नाग्या" चा व्यवसाय आता फलूनफुलून राहिला आहे, त्याला साहेबांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे त्याला कुणाची भिती नाही, असे त्याचे परिचित सांगतात. स्वत: "जगताप" साहेबांनी या "नाग्या" च्या लचक्या तोडून त्याच्यावर कारवाई करून पोलिस आपल्या पाठिशी आहे, हा "नाग्या" चा भ्रम अवश्य तोडावा, हीच त्यांच्याकडून यानिमित्ताने अपेक्षा आहे.