चंद्रपूर मध्ये एकाच दिवशी 57 बाधिताची नोंद



चंद्रपूर, दि. 5 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सर्वाधिक 57 बाधिताची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात मोठ्याप्रमाणात रुग्ण पुढे आल्यामुळे काल सायंकाळी 625 असणारी बाधितांची संख्या आज 682 वर पोहोचली आहे. यापैकी 406 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले असून 276 बाधितावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन बाधिताचा मृत्यू झाला आहे.
आज पुढे आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहर व लगतचा परिसर मिळून 23, बल्लारपूर शहर व विसापूर गाव मिळून एकूण 8, भद्रावती 7, वरोरा 5, राजुरा 2 , कोरपना 2, ब्रह्मपुरी 4, नागभीड 5 व नागपूर जिल्यािळचा रहिवासी असणारा एक असे एकूण 57 बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर शहरात मोठ्या संख्येने सापडलेल्या 23 रूग्णांमध्ये अँन्टीजेन टेस्टमध्ये बिहार येथून आलेल्या सात कामगारांचा समावेश आहे. हे सर्व पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील असून शहरात मोठ्या प्रमाणात संपर्कातून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. राजस्थान, तेलंगाना, उत्तर प्रदेश या भागातून प्रवास करून आलेले नागरिक, याशिवाय मुंबई व पुणे या शहरांमधून आलेल्या नागरिकांची बाधितांमध्ये अधिक नोंद आहे.
बल्लारपूर येथील शहर व विसापूर गाव मिळून 8 रुग्ण पुढे आले आहेत. यामध्ये श्वसनाचा आजार असणारा केवळ एक रुग्ण आहे. एक रुग्ण हैदराबाद वरून आलेला आहे. अन्य 7 आधीच्या पॉझिटिव्हच्या संपर्कात आल्याने बाधित झाले आहे.
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचणी वाढवण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांना देखील स्वतःहून चाचणी करण्यासाठी चंद्रपूर शहरांमध्ये पाण्याच्या टाकीजवळ सरदार वल्लभाई पटेल विद्यालय येथे व्यवस्था करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात सुरु करण्यात आलेल्या अँन्टीजेन चाचणीची संख्या बुधवारपर्यंत 9 हजारावर होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण पुढे येत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. पुढील काही दिवसात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली असून आवश्यकता नसताना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
जिल्ह्यात 5 ऑगस्ट रोजी सायंकाळपर्यंत आलेली 670 बाधितांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.
ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर 65, बल्लारपूर 11, पोंभूर्णा 9, सिंदेवाही 14, मुल 13, ब्रह्मपुरी 51, नागभीड 56, वरोरा 13, कोरपना 35, गोंडपिपरी तीन, राजुरा 8, चिमूर 18, भद्रावती 7, जिवती, सावली येथे प्रत्येकी 2 बाधित आहेत.
शहरी भागामध्ये बल्लारपूर 45, वरोरा 27, राजुरा 12, मुल 39, भद्रावती 45, ब्रह्मपुरी 24 बाधित आहेत.

चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर चार, बाबुपेठ 15, बालाजी वार्ड 6, भिवापूर वार्ड दोन, सुमित्रानगर चार, लुंबीनी नगर चार, तुकूम तलाव पाच, दूध डेअरी तुकूम दोन, पोलीस मंगल कार्यालय तुकूम 24 बाधित आहेत.
शास्त्रीनगर, स्नेह नगर, जोडदेउळ, लालपेठ, बिनबा गेट, दाद महल वार्ड, शिवाजी नगर तुकुम, इंदिरानगर तुकुम, लालपेठ, भानापेठ, हवेली गार्डन, लखमापूर हनुमान मंदिर,आजाद हिंद वार्ड तुकूम, संजय नगर, कोतवाली वार्ड, एकोरी वार्ड, जैन मंदिर तुकुम, साईनगर, क्रिस्टॉल प्लाझा, हॉस्पिटल वार्ड, रामाळा तलाव, श्यामनगर, गिरनार चौक, निर्माण नगर, नगीना बाग, विठ्ठल मंदिर, मेजर गेट तुकुम, बापट नगर, क्राईस्ट हॉस्पिटल, अयप्पा मंदिर, गोल्डन प्लाझा आंबेडकर सभागृह येथे प्रत्येकी एक बाधित आहेत.
बगल खिडकी, घुटकाळा ,रहमतनगर ,जयराजनगर (दांडिया ग्राउंड) तुकूम ,जगन्नाथ बाबा नगर येथे प्रत्येकी दोन बाधित आहेत. पागल बाबा नगर तीन,पठाणपुरा तीन,बंगाली कॅम्प येथे प्रत्येकी तीन बाधित आहे.
वडगाव चार,सिविल लाइन्स 6,अंचलेश्वर गेट पाच, चोर खिडकी सहा,रयतवारी वार्ड पाच,गोपाळपुरी 6, जटपुरा वार्ड पाच, रामनगर चार तर मथुरा (उत्तर प्रदेश) एक बाधित आहेत.
00000