CSTPS टॉवर चढलेल्या आंदोलकांचा "आत्मदहना"चा प्रयत्न !चंद्रपूर : महाजनकोने आमची जमीन अधिग्रहित करून आम्हाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते आश्वासन अद्याप त्यांनी पाळले नसल्यामुळे बुधवार दि. ५ आॉगस्ट ला 8 आंदोलनकर्त्यांनी CSTPS च्या टावर वर चढून आपल्या मागण्या पुर्ण व्हाव्या, यासाठी आंदोलन सुरू केले आहे दुसऱ्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असून सरकारने मागण्या पूर्ण केल्याची आश्वासन नाही ही तर पूर्तता करावी ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे हटणार नाही ही भूमिका घेतल्यामुळे प्रशासन आता काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारसह काही राजकीय पुढाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली मिळालेल्या माहितीनुसार जोरगेवार यांनी ऊर्जामंत्री व संबंधितांची यावेळी फोनवर बोलणे केले होते. यासंदर्भात सोमवारला मीटिंग घेण्याचे आश्वासन संबंधितांकडून मिळाले, परंतु आता पावतं आश्वासन मिळत असल्यामुळे आंदोलनकर्ते आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी आत्मदहनाचा केलेल्या प्रयत्नांमुळे प्रशासनात खळबळ माजली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री यांनी नागपूर येथे आंदोलनकर्त्यांनी भेट घेतल्याचे आश्र्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे. 

आंदोलकांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा !
यावेळी आ. जोरगेवार यांच्या पुढाकाराने प्रकल्पग्रस्त सचिन ठाकरे यांनीही दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली या विषयासंदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत सदर आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. तसेच  यावेळी आ. जोरगेवार यांनी प्रकल्पग्रस्त यांचा  मुख्यमंत्री यांच्याशी संवाद करून दिला. दरम्यान  पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी उद्या नागपूर येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा होणार असून यात खासदार बाळू धानोरकर व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेही व्ही. सी. द्वारे सहभागी होणार असून या बैठकीत प्रकल्प ग्रस्तांच्या मागण्याबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (CSTPS)  चंद्रपूर येथील वीज केंद्रातील जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यास विलंब होत असल्याने बुधवार दि. 5 अॉगस्ट रोजी आठ जण विज निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये संच क्रमांक 9 याठिकाणी प्रकल्पग्रस्तांनी  वीज केंद्रातील बायलर वरती चढून विरूगिरी केली.  यात पाच पुरुष व तीन महिला यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

 सविस्तर वृत्त असे की,  चंद्रपूर वीज केंद्रासाठी या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचा जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या, त्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांच्या कुटुंबियातील एखादाला स्थायी स्वरूपात नोकरी देण्याचा करार विज निर्माण कंपनीने प्रकल्पग्रस्तांसोबत केला होता,  मात्र अनेक वर्षे उलटूनही नोकर्‍या देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे संतप्त झालेले प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी यापूर्वी अनेकदा निवेदने, मोर्चे आंदोलने केली, फक्त आश्वासनाव्यतिरिक्त प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची कुठलीच दखल घेतली नसल्यामुळे आज त्यांनी बाष्पीभवन होणाऱ्या चिमणीवर चढून आंदोलन करावे लागले.
महत्वाचे म्हणजे आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात एल्गार पुकारला असून या एल्गारामध्ये पुरुषांच्या सोबत महिलांचा ही समावेश होता. CSTPS प्रशासनाचे अडेलतट्टू धोरण, प्रकल्पग्रस्तांच्या जिव्हारी लागल्यामुळे हे पाऊल त्यांना उचलावे लागले असल्याचे सांगितल्या जात आहे.

आंदोलनकर्त्यांनी यापूर्वी ही व्हिडिओ च्या माध्यमातून
महाजनकोने आमची जमीन अधिग्रहित करून आम्हाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते आश्वासन अद्याप त्यांनी पाळले नसून त्यासाठी हा पावित्रा आम्ही उचलला असून आश्वासनांची पुर्तता झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी चेतावणी दिली होती.