ठेकेदाराकडून गौण खनिजाची लूट



पोंभूर्णा/प्रतिनिधी
पोंभूर्णा तालुक्यातील अनेक कामात अवैध रेती व मुरूमाचे वापर होत आहे. पावसाळ्यात नदी, नाल्याला पाणी असते. त्यामुळे डंपिंग केलेल्या मालाची बेभाव विक्री केली जात आहे. येथील एका सरकारच्या कार्यालयात बांधकाम सुरू असून बिना परवाना मुरुम सर्रास वापर करणे चालू आहे. या कामात तालुक्यातील एक बहुरुपी पत्रकार दलाली करीत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार व नायब तहसीलदार विलगीकरणात आहेत. याचाच फायदा घेऊन अवैध मुरूम उत्खनन जोरात सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे बोलले जात आहे. संबंधित ठेकेदार एका बहुरुपी स्टार पत्रकाराच्या साथीने मुरुम कामाची लिज न काढता सर्रास उत्खनन सुरु आहे. या पत्रकाराच्या धमकीमुळेच कारवाई होत नसल्याची चर्चा आहे.
संबंधित ठेकेदार मुरुम कामात आपलीच मनमानी करित असून, ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.