पुरात अडकलेल्या मेंढपाळासह मेंढ्यांना बाहेर काढण्यात यश !गोसीखुर्द धरणाचे चार दरवाजे खुले केल्याने वैनगंगा नदीला पुर आला आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.त्यात सावली तालुक्यातील खापरी गावाजवळील वैनगंगा नदी काठावर मेंढ्या चारत असलेले मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथील नागेश इनमुलवार यांचे ३ मेंढपाळसह २५० मेढ्या पुरात अडकल्याची माहीती धनगर समाज संघर्ष समितीचे विभागीय अध्यक्ष डॉ तुषार मर्लावार, पं.स.सभापती विजय कोरेवार यांना मिळताच त्यांनी सावलीचे तहसीलदार पाटील यांना तात्काळ माहीती कळविले. माहीती मिळताच सावलीचे  तहसीलदार पाटील यांनी कुठलाही विल़ंब न लावता ताबडतोब पुरात अडकलेल्या शेकडो शेळ्या मेंढ्या सह मेंढपाळांना नावेव्दारे  सुखरूप बाहेर काढण्यास यश मिळविले आहे. तहसिलदार पाटील यांच्या या कार्यामुळे मेंढपाळ बांधवांनी आभार व्यक्त केले.