शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम,बुक पेन वाटप "एक हात मदतिचा"शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोरोना च्या महामारी मुळे शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणा पासून वंचित राहावे लागत आहे,ग्रामीण भागात कित्येक विद्यार्थी आर्थिक परिस्थिति मुळे बुक पेन विकत घेऊ शकत नाही,त्या मुळे गोर गरीब विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहु नये व विद्यार्थ्यां ना अभ्यासाची सवय लागावी म्हणून
प्रशांत गट्टूवार मा.शिवसेना तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वात बुक व पेन वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
मुख्यमंत्री साहेब यांच्या आव्हानाला शिवसेना तालुका मूल चे वतीने एक हात मदतिचा व
शिवसेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे यांचे विचाराला प्रेरित ८० टक्के समाज कारण २० टक्के राजकारण हे धोरण राबवित आज शेकडो विद्यार्थ्यां ना बुक पेन वाटप करुण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दुगनित करण्यात आले, गावागावात विद्यार्थ्यांना काही समश्या असतील तर ते त्वरित दूर करणार असा संकल्प या वेळी शिवसेना माजी तालुका प्रमुख तथा सदश्य ग्राम पंचायत चिचाळा प्रशांत गट्टूवार यानी यावेळी केला.या वेळी उपस्थित चिचाळा येथील युवा नेते श्री प्रेमदास निकेसर,गुणेश लेनगुरे,संतोष इटकलवार,शुभम बलगेलवार,बलवंत चलाख,विनोद चिचघरे,रोशन वाढ़ई,योगेश लेनगुरे,व अन्य युवक कार्यकर्ते उपस्थित होते.