देश्यात कोरोनाचे संकट पडले असल्याने देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी आर्थिक संकटात सापडलेल्या आहे.शेतकरी राजाचे आर्थिक संकट दुर करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात विठ्ठलाच्या फोटोला दुग्धाभिषेक करून राज्यभरात आंदोलन करण्यात आले.यावेळी ठाकरे सरकारला दु्धाचे दर किमान ३५ करण्यात यावे.या दरवाढीसाठी मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी देवो यासाठी विठ्ठलाला साकडे घालण्यात आले. राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालया समोर विठ्ठलास दुग्धाभिषेक करून प्रशासनास निवेदन देण्यात आले . राष्ट्रीय समाज पक्ष संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर माजी दुग्ध विकासमंत्री यांच्या आदेशानुसार तसेच राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर, मुख्य महासचिव पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर मेंढी शेळी विकास महामंडळ माजी अध्यक्ष श्री बाळासाहेब दोडतले यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलास दुग्धाभिषेक करून आंदोलन करण्यात आले