राजुरा प्रतिनिधी:- लाकडाऊन मध्ये विद्युत मंडळाने पाठवलेले विज भरमसाठ असून विज मंडळांनी जनतेवर लावलेली मनमानी होईल याकरिता वीर भगतसिंग संघ आणि सत्यशोधक शेतकरी सभेचे कार्यकर्त्यांनी मा. नायब तहसीलदार तहसील कार्यालय राजुरा यांना निवेदन दिले आणि प्रत्येक महिन्यातील दोनशे युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे अशी शिफारस केली तसेच शेतकऱ्यांनी या वेळेस केलेल्या सोयाबीन पेरणी शेतकऱ्यांचे सोयाबीन वापले नाही याचे कारण म्हणजे कंपनीने पाठवलेले बोगस बियाणे होय यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे आणि त्या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी शिफारस केली आणि सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्यावी अशी शिफारस केली यावेळी स्वप्निल कोहपरे अध्यक्ष वीर भगतसिंग संघ, रोशन येवल जिल्हाध्यक्ष सत्यशोधक शेतकरी सभा , विजय कामेपलीवार महासचिव , प्रदीप भोबळे संदेश वडस्कर वीर भगतसिंग तालुका सचिव सुमित कोहपरे जिल्हा संघटक ,, मारुती कोतापलीवार ,शिव पिंपळशेंडे, आशिष मोरे , मारुती वाढयी, प्रदीप मडावी , प्रदीप जानवे , प्रशांत आईलवार , रितिक येवले आदी उपस्थित होते.