चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे व्यंकय्या नायडूंचा जाहीर निषेध..!



'जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा देण्यापासून खुद्द छत्रपतींचे वंशज श्रीमंत उदयनराजे भोसले महाराजांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला याचा आम्ही एक शिवप्रेमी म्हणून जाहीर निषेध करतो.

दिल्लीच्या तख्ताकडून महाराष्ट्राचा अपमान करण्याचे अनेक प्रसंग इतिहासात घडले आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने याच दिल्लीचे तख्त महाराष्ट्राने आपल्या मुठीत ठेवले होते हा ही इतिहास कोणी विसरू नये.


छत्रपती आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या भाजपा च्या व्यंकैया नायडू ने लक्षात ठेवावे की, आमच्या रगारगात शिवछत्रपतींचे रक्त आहे आणि पुन्हा एकदा आम्ही दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकवू.
व म्हणून याकरिता आज चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे "जय भवानी जय शिवाजी" हे लिहून सोशल डिस्टेनसिंग चे पालन करीत आज सर्व कार्यकर्त्यांनी व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठविले. सदर पत्रे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात रा. यु. काँ. शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, राष्ट्रवादी विध्यार्थी कांग्रेस जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगरे, जिल्हा सचिव अभिनव देशपांडे, शहर अध्यक्ष मंगेश बारसागडे, किसन अरदळे, राहुल भगत उपस्थित होते.