राज्यमंत्र्यांनी पतंग उडविण्याचा,सुरपाट्या खेळण्याचा आनंद लुटलामुंबई : राज्यावर असलेले कोरोनाचे संकट त्यामध्ये मतदार संघातील जनतेची आणि पालकमंत्री म्हणून जबाबदारी असलेल्या जिल्ह्याची काळजी.या धकाधकीच्या जीवनात नागपंचमीच्या सणाच्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी गावातील बच्चे कंपनी सोबत पतंग उडवित सुरपाट्या खेळून आनंद लुटला.

ग्रामिण भागात विशेषत : पश्चिम महाराष्ट्रात नागपंचमीच्या सणाला पुरूष मंडळी एकत्रित येवून मैदानी खेळाचा आनंद लुटतात तर बच्चे कंपनी पतंग उडवून हा सण साजरा करतात.मात्र यंदा राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने हा सण साजरा करण्यावर बंधने आली होती.इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्याकडे सोलापूरचे पालकमंत्रीपद असल्याने राज्यभर दौरे,सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा,स्वत: च्या मतदार संघातील जनतेच्या समस्या याची सोडवणूक करतानाच नागपंचमीच्या सणा दिवशी राज्यमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी मौजे निमगाव केतकी येथील युवकांसमवेत महाराष्ट्राची परंपरा जोपासणारा सुरपाट्याचा खेळ खेळून कोरोनाच्या संकटात जनतेच्या मनावर असणारा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी गावातील ज्येष्ठ नागरीक आणि तरूणांसोबत सुरपाट्या खेळून व्यायाम तसेच खेळ किती महत्त्वपूर्ण आहे याचा एक प्रकारे संदेश दिला.

सुरपाट्याचा आनंद सुटल्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी आपला मोर्चा बच्चे कंपनीकडे वळवला.गावात पतंग उडविणा-या लहान लहान मुलांमध्ये मिसळून त्यांनी पतंग उडवून लहान मुलांनाही कोरोनाच्या ताणतणावातून मुक्त करण्याचा हलकासा प्रयत्न केला.नागपंचमीच्या सणाचा आनंद घेत असताना सुरपाट्या खेळतानाचा आणि लहान मुलांसोबत पतंग उडवित असतानाचा फोटो त्यांनी ट्विट करून शेअर केला आहे.नागपंचमीच्या सणाच्या निमित्ताने युवकांसमवेत महाराष्ट्राची परंपरा जोपासणारे मैदानी खेळ खेळून कोरोनाच्या संकटाच्या काळात व्यायाम तसेच खेळ किती महत्त्वपूर्ण आहे.याचा अनूभव स्वत: खेळामध्ये सहभागी होऊन युवकांना त्यांनी सुखद दिलासा दिला.हा आनंद घेताना, हा आनंद मला महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा बघायचा आहे. होय आपण तो पुन्हा मिळवू..असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.