चामोर्शी मार्गावर वाहने फसण्याचा सिलसिला सुरू, एका बाजूस फुटभर खोल खड्डे पडूनही कंत्राटदाराचे दुर्लक्ष
गडचिरोली प्रतिनिधी - गडचिरोली- चामोर्शीे राष्ट्रीय महामार्गावर एका बाजुस कामास प्रारंभ न केल्याने या महामार्गावर पावसामुळे अवजड वाहने फसण्याला सुरूवात झाली आहे.यामुळे वाहतुकीत खोडंबा सुरू असल्याने वाहनधारकांना लाखो रूपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.शासकिय विज्ञान महाविद्यालयापासुन ते डॉ मल्लीक यांच्या दवाखान्यापर्यत एका बाजुचे काम करण्यात आले आहे.मात्र शिवकृपा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयासमोरील नाल्याच्या दोन्ही बाजूला मजबुतीकरण करण्यात न आल्याने. या मार्गावरून अवजड वाहने जाण्या येण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे वाहन चालकांना दुसऱ्या बाजूने वाहने चालवावी लागत आहे.या मार्गावर जिल्हा परिषद हायस्कूल समोर तसेच राधे ईमारतीसमोर मोठे खड्डे पडले आहेत . जवळपास एक ते दोन फूट खोल. खड्ड्यात पाणी साचल्याने रात्रीच्या सुमारास वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही.त्यामुळे अवजड वाहने या ठिकाणी फसत आहेत.त्यामुळे वाहन धारकांना लाखो रूपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.वाहने फसल्यामुळे वाहतुकीत खोडंबा निर्माण होत आहे.तर दुसऱ्या बाजूला समर्थ यांच्या दुकानासमोर गेल्या कित्येक दिवसापासून ट्रक उभा आहे.तसेच चामोर्शी मार्गावरील गॅरेज समोरही वाहने सिमेंट रस्त्यावर दुरूस्त केली जातात.यामुळे या मार्गावरून वाहने काढण्यास अडचण अडचण निर्माण होत आहे. पालीका प्रशासन व चालकांना दुसऱ्या बाजुने वाहने कंत्राटदाराने या बाबीची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे .